Video : काळजाचा थरकाप उडवणारी घटना कॅमेऱ्यात कैद! दुचाकीस्वार थोडक्यात बचावले

चांदशी येथील मुख्य चौकामध्ये पिंपळाच्या झाडाची मोठी फांदी अचानक पडली. नेमक्या याच वेळी काही क्षण आधी दुचाकी पास होणार होती. पण दुचाकीस्वाराच्या मनात काय आलं कुणास ठावूक? दुचाकीस्वाराने गाडीचे वेग कमी केला आणि दुचाकी थांबवली.

Video : काळजाचा थरकाप उडवणारी घटना कॅमेऱ्यात कैद! दुचाकीस्वार थोडक्यात बचावले
थरारक घटनाImage Credit source: Twitter Video Grab
Follow us
| Updated on: Aug 28, 2022 | 1:51 PM

नाशिक : पुण्यात (Pune Tree Collapse) झाड कोसळायला आणि दोघे दुचाकीस्वार नेमके त्याच वेळी झाडाच्या खाली चिरडले जायला, एकच वेळ आणि काळ ठरली होती. या दुर्दैवी घटनेत दोघा दुचाकीस्वारांचा जीव गेला होता. काही आठवड्यांपूर्वी घडलेल्या पुण्यातल्या या दुर्दैवी घटनेची पुनरावृत्ती आता नाशिकमध्येही (Nashik Tree Collapse Video) घडलीय. पण सुदैवानं दैवं बलवत्तर म्हणून दोघा दुचाकीस्वारांचा जीव अगदी थोडक्यात वाचलाय. विशेष म्हणजे यावेळी दोघा दुचाकीस्वारांनी हेल्मेटही घातलेलं नव्हतं. त्यामुळे एका क्षणासाठी जरी ब्रेक लागण्याची वेळ चुकली असती, तर काही खरं नव्हतं. काळजाचा ठोका चुकवणारी ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. दूरवर लावलेल्या एका सीसीटीव्ही (CCTV Video) कॅमेऱ्यात झाड कोसळतानाचा थरार रेकॉर्ड झालाय. या थरारक घटनेतून दोघे दुचाकीस्वार अगदी बालंबाल बचावलेत. यावेळी रस्त्यावर फारशी वर्दळ नव्हती. त्यामुळे थोडक्यात मोठा अनर्थ टळलाय.

थरारक घटना

नाशिक जिल्ह्यातील चांदशी येथे ही घटना घडली. चांदशी येथील मुख्य चौकामध्ये पिंपळाच्या झाडाची मोठी फांदी अचानक पडली. नेमक्या याच वेळी काही क्षण आधी दुचाकी पास होणार होती. पण दुचाकीस्वाराच्या मनात काय आलं कुणास ठावूक? दुचाकीस्वाराने गाडीचे वेग कमी केला आणि दुचाकी थांबवली. दुचाकी थांबायला आणि त्याच्या पुढ्यातच पिंपळाच्या झाडाची मोठा फांडी रस्त्यावर कोसळायला, एक झालं. दुचाकीस्वारालाही आपण बालंबाल बचावले गेलो आहोत, याची जाणीव झाली. तोही या प्रसंगाने शहारुन गेला.

पाहा व्हिडीओ :

अग्निशमन दलाला यानंतर झाड कोसळल्याच्या घटनेची माहिती नंतर देण्यात आली. त्यांनी काही तासांच्या प्रयत्नांनी रस्त्यावर पडलेली ही फांदी बाजूला हटवली. यानंतर या मार्गावर खोळंबलेली वाहतूकही पूर्ववत करण्याचे प्रयत्न करण्यात आले. दरम्यान, या घटनेमुळे परिसरातील धोकादायक आणि मोडकळीस आलेल्या वृक्षांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. याकडे प्रशासनाने लक्ष वेधण्याची गरज असल्याची मागणी स्थानिक लोकप्रतिनिधींकडून केली जातेय. त्याकडे आता प्रशासन नेमकी काय दखल घेतं हे पाहणं महत्त्वाचंय.

दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.