Kasara Accident : दैव बलवत्तर म्हणून…कसारा घाटात भीषण अपघात, 40 मिनिटांनी चालकाची सुखरुप सुटका

रविंद्र सिंग आणि अमित कुमार शुक्ला हे दोघे कंटनेर घेऊन नाशिकहून मुंबईकडे सकाळी चालले होते. नवीन कसारा घाटात कंटेनर येताच चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि लतिफवाडीच्या वळणावर कंटनेर पलटी झाला. चालक आणि क्लिनर कंटेनरमध्ये अडकले होते.

Kasara Accident : दैव बलवत्तर म्हणून...कसारा घाटात भीषण अपघात, 40 मिनिटांनी चालकाची सुखरुप सुटका
कसारा घाटात भीषण अपघातImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: May 30, 2022 | 12:13 AM

कसारा : वाहनावरील नियंत्रण सुटल्याने एका टेम्पोला भीषण अपघात (Accident) झाल्याची घटना नवीन कसारा घाटात रविवारी सकाळी घडली आहे. सदर कंटेनर नाशिकहून मुंबईला जात होता. लतिफवाडीच्या वळणावर चालकाचे गाडीवरील नियंत्रण (Control) सुटले आणि कंटेनर (Container) पलटी झाला. विशेष म्हणजे दैव बलवत्तर म्हणून एवढा भीषण अपघात होऊनही चालक आणि क्लिनर दोघेही सुखरुप बचावले. तब्बल 40 मिनिटांनी कंटेनरमध्ये अडकलेल्या चालकाची सुखरुप सुटका करण्यात आली. चालकाच्या पायला गंभीर जखम झाली असून क्लिनर किरकोळ जखमी झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य सुरु केले. रविंद्र सिंग असे चालकाचे तर अमित कुमार शुक्ला असे क्लिनरचे नाव आहे.

आपत्ती व्यवस्थापनने शर्थीचे प्रयत्न करुन चालकाला बाहेर काढले

रविंद्र सिंग आणि अमित कुमार शुक्ला हे दोघे कंटनेर घेऊन नाशिकहून मुंबईकडे सकाळी चालले होते. नवीन कसारा घाटात कंटेनर येताच चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि लतिफवाडीच्या वळणावर कंटनेर पलटी झाला. चालक आणि क्लिनर कंटेनरमध्ये अडकले होते. अपघाताची माहिती मिळताच कसारा घाट महामार्ग पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर पोलिसांनी आपत्ती व्यवस्थापन टीमशी संपर्क साधला. आपत्ती व्यवस्थापन टीमही तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. त्यानंतर आपत्ती व्यवस्थापनने 40 मिनिटे शर्थीचे प्रयत्न करत जखमी चालकाला बाहेर काढले. चालकाला उपचारासाठी इगतपुरी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. (Serious accident to container in Kasara Ghat, safe rescue of driver after 40 minutes)

हे सुद्धा वाचा

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.