Nashik Crime : मुलीचे प्रेमप्रकरण सुरु होते, बापाला कळताच मुलीसोबत ‘जे’ केले ते भयानकच !

नाशिकच्या अंबड लिंक रोडवरील चुंचाळे परिसरातील रामकृष्ण नगर भागात ही घटना घडली. या परिसरात राहणारे रामकिशोर भारती यांच्या मुलीचे एका मुलाशी प्रेमसंबंध होते. मुलीचे हे प्रेमसंबंध वडील रामकिशोर यांना मान्य नव्हते.

Nashik Crime : मुलीचे प्रेमप्रकरण सुरु होते, बापाला कळताच मुलीसोबत 'जे' केले ते भयानकच !
प्रेम प्रकरणातील वादातून पित्यानेच पोटच्या मुलीला संपवलेImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jan 17, 2023 | 3:49 PM

नाशिक / चैतन्य गायकवाड (प्रतिनिधी) : मुलीचे प्रेमसंबंध मान्य नसल्याने बापानेच पोटच्या लेकीची हत्या केल्याची धक्कादायक घटना नाशिकमधील अंबडमध्ये उघडकीस आली आहे. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी बापाला ताब्यात घेतले आहे. रामकिशोर भारती असे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपी पित्याचे नाव आहे. तर ज्योती भारती असे पीडित तरुणीचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे. अंबड पोलीस या घटनेचा अधिक तपास करीत आहेत.

मुलीचे एका तरुणाशी प्रेमसंबंध सुरु होते

नाशिकच्या अंबड लिंक रोडवरील चुंचाळे परिसरातील रामकृष्ण नगर भागात ही घटना घडली. या परिसरात राहणारे रामकिशोर भारती यांच्या मुलीचे एका मुलाशी प्रेमसंबंध होते. मुलीचे हे प्रेमसंबंध वडील रामकिशोर यांना मान्य नव्हते.

प्रेमप्रकरणावरुन वडील आणि मुलीमध्ये वारंवार भांडण व्हायचे

या कारणावरून वारंवार मुलगी आपल्या प्रियकरासोबत पळून जात होती. त्यामुळे रामकिशोर आणि त्यांच्या मुलीमध्ये वारंवार भांडण होत होते. नेहमीप्रमाणे आज देखील संशयित रामकिशोर आणि त्यांची मुलगी ज्योती भारती यांचे भांडण झाले.

हे सुद्धा वाचा

राग अनावनर झाल्याने पित्याने मुलीला संपवले

या भांडणात रामकिशोर यांचा राग अनावर झाल्याने त्यांनी राहत्या घरात ओढणीच्या साहाय्याने ज्योती हिचा गळा आवळून तिची हत्या केली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगिरथ देशमुख यांच्यासह पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणी पोलिसांनी संशयित रामकिशोर भारती याला ताब्यात घेतले असून, पुढील तपास पोलीस करीत आहे.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.