AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nashik Cooler Death : कुलरचा कहरच सुरुच, आज नातीनेही जीव सोडला, आईची मृत्यूशी झूंज सुरुच, आजोबा, नातवानंतर मुलीला घर पोरकं

कुलरजवळ ठेवलेल्या शेतीपिकांवरील विषारी औषधांचे द्रव हवेत पसरल्याने खोलीत झोपलेले आजोबा, बहिण, भाऊ, आई यांना श्वासोच्छवासाचा त्रास झाला असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. मात्र अजुनही त्यांच्या मृत्यूच्या मूळ कारणाबाबत शिक्कामोर्तब झाला नसून पुणे प्रयोगशाळेच्या नमुन्यांच्या अहवालाकडे जिल्हा प्रशासनाचे लक्ष लागून आहे.

Nashik Cooler Death : कुलरचा कहरच सुरुच, आज नातीनेही जीव सोडला, आईची मृत्यूशी झूंज सुरुच, आजोबा, नातवानंतर मुलीला घर पोरकं
महड दुर्घटनेतील मुलीची मृत्यूशी झुंज अपयशीImage Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Apr 29, 2022 | 5:14 PM
Share

मालेगाव : बागलाण तालुक्यातील महड घटनेत आजोबा, भाऊ पाठोपाठ आज नेहा अनिल सोनवणे या बालिकेची मृत्यूशी सुरु असलेली झुंज अपयशी ठरली. नाशिक येथे उपचारादरम्यान मृत्यू (Death) तिने शेवटचा श्वास घेतला. या घटनेतील महिलेची प्रकृती अधिकच चिंताजनक (Critical) असल्याचे वैद्यकीय सुत्रांनी सांगितले. मात्र या कुटुंबाला नेमकी कशाची बाधा झाली, हे अद्याप कळू शकले नाही. एकाच कुटुंबातील तिघांचा असा दुर्देवी मृत्यू झाल्याने संपूर्ण बागलाण तालुक्यात शोककळा पसरली आहे. कुलरच्या हवेत विषारी द्रव पसरल्याचा प्राथमिक अंदाज वैद्यकीय सुत्रांनी वर्तविला असला तरी मृतांच्या कुटुंबियांनी हा अंदाज खोडून काढला आहे. (The girl in the Mahad incident died during treatment in nashik)

अचानक कुटुंबाची प्रकृती चिंताजनक

महड येथे पत्र्याच्या खोलीत कुटुंबातील हे चौघे झोपलेले असताना सकाळी त्यांची प्रकृती अचानक चिंताजनक झाली होती. त्यांना तात्काळ उपचारासाठी नाशिक येथे दाखल केले होते. मात्र मुलाचा नाशिक येथे तर आजोबांचा पुणे येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर बहिणीचा देखील उपचारादरम्यान मृत्यू झाला असून या मुलांची आई सरिता सोनवणे यांच्यावर नाशिक येथे उपचार सुरु आहेत. मात्र त्यांची प्रकृती देखील चिंताजनक असल्याचे सुत्रांनी सांगितले.

पुणे प्रयोगशाळेच्या अहवालानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होईल

कुलरजवळ ठेवलेल्या शेतीपिकांवरील विषारी औषधांचे द्रव हवेत पसरल्याने खोलीत झोपलेले आजोबा, बहिण, भाऊ, आई यांना श्वासोच्छवासाचा त्रास झाला असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. मात्र अजुनही त्यांच्या मृत्यूच्या मूळ कारणाबाबत शिक्कामोर्तब झाला नसून पुणे प्रयोगशाळेच्या नमुन्यांच्या अहवालाकडे जिल्हा प्रशासनाचे लक्ष लागून आहे. जर या कुटुंबातील सदस्यांना विषारी हवेचीच बाधा झाली असेल तर सध्या सुरु असलेल्या तीव्र उन्हाळ्यामुळे घरोघरी कुलर बसविण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांनी कुलर किंवा एससी सुरु करताना त्या खोलीत काही विषारी औषध मोकळे तर नाही ना, याची काळजी घेणे तितकेच गरजेचे आहे. (The girl in the Mahad incident died during treatment in nashik)

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.