Nashik Crime : नाशिक जिल्ह्यातील दोन सराईत गुन्हेगार ताब्यात, तीन कट्ट्यांसह 12 राऊंड जप्त

मालेगाव शहरातील छावणी पोलिस ठाण्याच्या हद्दीत गस्तीवर असलेल्या पोलिस पथकाने दोन संशयितांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी व झडती घेतले असता पोलिसांनी दोघांजवळून तीन गावठी कट्टे तसेच 12 राऊंड जप्त केले आहे.

Nashik Crime : नाशिक जिल्ह्यातील दोन सराईत गुन्हेगार ताब्यात, तीन कट्ट्यांसह 12 राऊंड जप्त
Follow us
| Updated on: Feb 24, 2022 | 8:42 PM

मालेगाव : गेल्या महिनाभरापासून मालेगाव शहरात गुन्हेगारी (Crime)चे प्रमाण प्रंचड वाढले आहे. दिवसागणिक वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले असून गुन्हेगार मात्र सैराट झाले आहेत. शहरात गेल्या दोन महिन्यांपासून सर्रासपणे गावठी कट्टे बाळगणे तसेच भांडणाच्यावेळी गावठी कट्ट्यांतून हवेत गोळीबार करण्याच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. मालेगाव शहरातील छावणी पोलिस ठाण्याच्या हद्दीत गस्तीवर असलेल्या पोलिस पथकाने दोन संशयितां (Suspicious)ना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी व झडती घेतले असता पोलिसांनी दोघांजवळून तीन गावठी कट्टे तसेच 12 राऊंड (12 Round) जप्त केले आहे. छावणी पोलिस याबाबत अधिक तपास करीत आहेत. (Two criminals arrested in Nashik district, Seized 12 rounds with three pistools)

उस्मानाबादमध्ये पारधी समाजाच्या दोन गटात तुंबळ हाणामारी

उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथे पारधी समाजाच्या दोन गटात झालेल्या तुंबळ हाणामारी प्रकरणात 20 जणांवर नळदुर्ग पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आली आहे. या हाणामारीत जवळपास 10 जण जखमी त्यातील 2 जण गंभीर जखमी आहेत. तलवार, कोयतासह अन्य हत्यारांनी एकमेकांवर वार करण्यात आले आहेत. चिवरी येथील लक्ष्मी देवीच्या यात्रेत हा प्रकार घडला आहे. जखमींवर उस्मानाबाद जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. महिलेला धक्का दिल्याच्या कारणावरुन 2 गटात मारामारी झाली असून पोलिस तपास सुरु आहे.

कल्याणमध्ये 55 किलो गांजा जप्त

भुवनेश्वरकडून मुंबईकडे येणाऱ्या सुपर फास्ट एक्स्प्रेसच्या वातानुकुलीत बोगीतून 5 लाख 53 हजार रुपये किमतीचा तब्बल 55 किलो गांजा कल्याण आरपीएफने जप्त केला आहे. हा गांजा आणणाऱ्या सम्राट बाबुराव पात्रा, संजू अहमद गाजी आणि अजगर अली बहाद्दूर खान या तिघांना अटक करण्यात आली आहे. हे तिघे भांडत असताना एक्स्प्रेसमध्ये पेट्रोलिंगदरम्यान आरपीएफ जवानांचे त्यांच्याकडे लक्ष गेलं त्याच्या हालचाली संशयास्पद आढळल्याने त्यांना ताब्यात घेतले. या तिघांना कल्याण रेल्वे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आहे. त्यांनी हा गांजा कोठून आणला आणि कोणाला त्याची विक्री केली जाणार होती याचा तपास कल्याण रेल्वे पोलिसांकडून सुरु आहे. (Two criminals arrested in Nashik district, Seized 12 rounds with three pistools)

इतर बातम्या

खळबळजनक ! परळीत वृद्ध बहिण-भावाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या, हत्येचे कारण अस्पष्ट

WhatsApp : व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपच्या अ‍ॅडमिनसाठी महत्त्वाची बातमी; आक्षेपार्ह मेसेजला अ‍ॅडमिन जबाबदार नाही : केरळ हायकोर्ट

काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.
शाळेच्या शौचालयात विद्यार्थिनीचं टोकाच पाऊल अन् संपवलं जीवन, काय घडलं?
शाळेच्या शौचालयात विद्यार्थिनीचं टोकाच पाऊल अन् संपवलं जीवन, काय घडलं?.
'तर आम्ही आमचा मार्ग...'; मविआत वादाची ठिणगी? राऊतांचं मोठं वक्तव्य
'तर आम्ही आमचा मार्ग...'; मविआत वादाची ठिणगी? राऊतांचं मोठं वक्तव्य.
मंत्रिपद तूर्त वाचलं, मुंडेंच्या राजीनाम्यावर दादा स्पष्टच म्हणाले...
मंत्रिपद तूर्त वाचलं, मुंडेंच्या राजीनाम्यावर दादा स्पष्टच म्हणाले....
आकाचा आकासुद्धा 302 च्या लाईनमध्ये? सुरेश धसांचा वाल्मिक कराडला इशारा
आकाचा आकासुद्धा 302 च्या लाईनमध्ये? सुरेश धसांचा वाल्मिक कराडला इशारा.
'हाके भाजपचे हस्तक', माईकच हिस्कावला अन् स्थानिकांनी त्यांनाच सुनावलं
'हाके भाजपचे हस्तक', माईकच हिस्कावला अन् स्थानिकांनी त्यांनाच सुनावलं.
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.