AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Zarif Baba : झरीफ बाबाही होता आयबीच्या रडारवर; बॉलिवूडमधील खान नावाचा वापर करून करोडोची कमाई

झरीफ बाबाने त्याच्या व्हिडिओंमध्ये बाॅलीवूड अभिनेता शाहरुख, सलमान आणि आमिर खान या स्टार्सची नावे आणि छायाचित्रे वापरल्यामुळे झरीफ बाबाच्या फाॅलोअर्सची संख्या अल्पावधीतच लाखोंपर्यंत पोहोचली.

Zarif Baba : झरीफ बाबाही होता आयबीच्या रडारवर; बॉलिवूडमधील खान नावाचा वापर करून करोडोची कमाई
ख्वाजा सय्यद चिश्ती उर्फ ​​झरीफ बाबाImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Jul 08, 2022 | 12:34 AM

नाशिक : येवल्यात अफगाण वंशाचा निर्वासित ख्वाजा सय्यद चिश्ती उर्फ ​​झरीफ बाबा (Zarif Baba)च्या झालेल्या हत्येप्रकरणी आज (गुरुवारी) एका आरोपीला अटक (Arrest) करण्यात आली आहे. इतर आरोपींच्या शोधासाठी तीन पथके (Three Team) तैनात करण्यात आली असून त्यापैकी एक पथक लवकरच उत्तर प्रदेशला जाणार आहे. दरम्यान, 35 वर्षीय जरीफ बाबा बॉलीवूडच्या तीन खानांच्या नावाचा वापर करून करोडोंची कमाई करत होता. त्याच्या व्हिडीओमध्ये त्याने शाहरुख, सलमान आणि आमिर खानचा फोटो आणि त्यांचा एडिट केलेला व्हिडीओ वापरून बक्कळ कमाई केल्याची धक्कादायक माहिती पोलिस तपासात समोर आली आहे.

झरीफ बाबा, त्याची पत्नी व ड्रायव्हरची गेल्या वर्षी झाली होती चौकशी

बाॅलिवूडमधील ‘खान’ स्टार्स आपल्या शब्दांचे पालन करून इतके मोठे झाले आहेत, असे सांगण्याचा प्रयत्न झरीफ बाबाने त्याच्या व्हिडिओंमधून केल्याचे उघडकीस आले आहे. या व्हिडिओंच्या मदतीने बाबांचे फॉलोअर्स आणि कमाई झपाट्याने वाढली. त्यानंतर हा झरीफ बाबा आयबीच्या (इंटेलिजन्स ब्युरो) रडारवर आला. वावी पोलिसांनी २०२१ मध्ये झरीफ बाबा, त्याची पत्नी आणि ड्रायव्हर गफ्फार यांची चौकशी केल्यानंतर २२ एप्रिल २०२१ रोजी इंटेलिजन्स ब्युरोला (आयबी) अहवाल सादर केला होता. सुफी झरीफ बाबा यांच्या हत्येमध्ये बाबाच्या ड्रायव्हरशिवाय त्याच्या अटेंडंटचाही सहभाग होता. त्याने अन्य दोघांसह हा गुन्हा केला आणि बाबाची एसयूव्ही कार, दोन मोबाईल घेऊन पळ काढला, असे नाशिक पोलिसांनी म्हटले आहे.

सिनेस्टार्सची नावे वापरल्याने फॉलोअर्स वाढले

झरीफ बाबाने त्याच्या व्हिडिओंमध्ये बाॅलीवूड अभिनेता शाहरुख, सलमान आणि आमिर खान या स्टार्सची नावे आणि छायाचित्रे वापरल्यामुळे झरीफ बाबाच्या फाॅलोअर्सची संख्या अल्पावधीतच लाखोंपर्यंत पोहोचली. त्याचे एका यूट्यूब चॅनलवर 2 लाख 27 हजारांहून अधिक, फेसबुकवर 5 लाख आणि इंस्टाग्रामवर 17.5 हजारांहून अधिक फॉलोअर्स होते. फाॅलोअर्सची संख्या सातत्याने वाढत होती. त्याला एकट्या यूट्यूबवर 60 दशलक्षाहून अधिक व्ह्यूज मिळाले होते. बाबाच्या नावावर आणखी दोन यूट्यूब चॅनेल आहेत. झरीफ बाबाच्या कमाईचे हे चॅनेल्सही सर्वात मोठे साधन होते, असे पोलिस सूत्रांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा

अनेक लोक झरीफ बाबाच्या स्टाईलच्या प्रेमात

झरीफ बाबाच्या बोलण्याची शैली, दिसणे व त्याची लोकांसोबत वागण्याची पद्धत यामुळे सामान्य लोकांमध्ये तो झपाट्याने प्रसिद्ध होत गेला. त्याच्या व्हिडिओंमध्ये तो सूफी पोशाखात नाचताना दिसत आहे. याशिवाय तो झाडूच्या साहाय्याने महिला, लहान मुले आणि वृद्धांना बरे करण्याचा दावा केला जात असे. त्यामुळे त्याना भेटण्यासाठी देशभरातून लोक येऊ लागले होते. बाबाला यूट्यूब चॅनलसह काही धार्मिक संस्थांकडून मोठी रक्कम मिळत होती. बाबाच्या जंगम आणि स्थावर संपत्तीत गेल्या चार वर्षात प्रचंड वाढ झाली होती, त्यामुळे त्याचे अनेक शत्रू झाले होते. यातील बहुतांश मालमत्ता बाबाच्या जवळच्या मित्रांच्या नावावर खरेदी करण्यात आल्या होत्या, असेही तपासात समोर आले आहे. सूफी बाबा निर्वासित असल्याने त्याला येथे मालमत्ता खरेदी करता आली नाही. तसेच त्याचे बँकेत खातेही नव्हते. त्यामुळे त्याने आपल्या एका जवळच्या मित्राच्या नावाने बँक खाते उघडले. दुसऱ्याच्या नावाने SUV 500 खरेदी केली. त्यामुळे बाबाच्या मालमत्तेचा मागोवा घेण्यासाठी थोडा वेळ लागेल, असे एसपी सचिन पाटील यांनी सांगितले. (Zarif Baba was also on IB target; Making millions using the name Khan in Bollywood)

वैभवी देशमुखला 85.33 टक्के; वडिलांच्या आठवणीने अश्रु अनावर
वैभवी देशमुखला 85.33 टक्के; वडिलांच्या आठवणीने अश्रु अनावर.
भारतानं पाकचं पाणी रोखल, खळखळून वाहणाऱ्या 'चिनाब'ची अवस्था नाल्यासारखी
भारतानं पाकचं पाणी रोखल, खळखळून वाहणाऱ्या 'चिनाब'ची अवस्था नाल्यासारखी.
2 आणि 5 वर्षांची मुलं पाकिस्तानात, आई भारतात; अटारी सीमेवर ताटातुट
2 आणि 5 वर्षांची मुलं पाकिस्तानात, आई भारतात; अटारी सीमेवर ताटातुट.
काँग्रेस फोडा, खाली करा... ते आपल्याकडे.. भाजपच्या बड्या नेत्याचा आदेश
काँग्रेस फोडा, खाली करा... ते आपल्याकडे.. भाजपच्या बड्या नेत्याचा आदेश.
युद्धाची चाहूल? पीओकेमध्ये पळापळ, रेशनची साठवणूक, मदरशे बंद
युद्धाची चाहूल? पीओकेमध्ये पळापळ, रेशनची साठवणूक, मदरशे बंद.
भारतीय सुरक्षा संस्थांकडून अ‍ॅक्टिव्ह दहशतवादी समोर, मुख्य लीडर कोण?
भारतीय सुरक्षा संस्थांकडून अ‍ॅक्टिव्ह दहशतवादी समोर, मुख्य लीडर कोण?.
आज बारावीचा निकाल; निकालापूर्वी वडिलांच्या आठवणीने वैभवी भावुक
आज बारावीचा निकाल; निकालापूर्वी वडिलांच्या आठवणीने वैभवी भावुक.
यंदाही कोकणचे विद्यार्थी अव्वल; सर्वाधिक 96.74 टक्के निकाल
यंदाही कोकणचे विद्यार्थी अव्वल; सर्वाधिक 96.74 टक्के निकाल.
बारावीचा रिझल्ट लागला, राज्याचा निकाल किती टक्के? यंदा बाजी कोणाची?
बारावीचा रिझल्ट लागला, राज्याचा निकाल किती टक्के? यंदा बाजी कोणाची?.
भारताची पाऊलं अफगाणिस्ताननं ओळखली? माजी राष्ट्रपती म्हणाले, असं वाटतंय
भारताची पाऊलं अफगाणिस्ताननं ओळखली? माजी राष्ट्रपती म्हणाले, असं वाटतंय.