Nashik | नगरसेवकांच्या सहलीत नगरसेविकेचा मृत्यू; सुरगाणा येथे नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीपूर्वीच घाला
नाशिक जिल्ह्यातल्या सुरगाणा नगरपंचायतीच्या निवडणुकीत झालाय. येथे नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीपू्र्वी नगरसेवकांच्या सहलीत गेलेल्या नगरसेविकेचा मृत्यू झालाय. काशीबाई नामू पवार, असे मृत नगरसेविकेचे नाव आहे. या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.
नाशिकः राजकारण अतिशय वाईट असते. त्याला कारण म्हणजे तिथे स्वार्थापायी खुंटीला टांगून ठेवलेली नैतिक मूल्ये. हे इतके विचित्र असते की, आपल्याच पक्षाच्या निवडूण आलेल्या सदस्यांवर श्रेष्ठींचा विश्वास नसतो. त्यामुळे त्यांना विजयानंतर सहलीला पाठविण्याची नसती खटाटोप करावी लागते. मात्र, यात अनेक सामान्य नाहक भरडले जातात. तसाच प्रकार नाशिक (Nashik) जिल्ह्यातल्या सुरगाणा नगरपंचायतीच्या (Nagar Panchayat) निवडणुकीत झालाय. येथे नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीपू्र्वी (Election) नगरसेवकांच्या सहलीत गेलेल्या नगरसेविकेचा मृत्यू झालाय. काशीबाई नामू पवार, असे मृत नगरसेविकेचे नाव आहे. या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे. मात्र, अशा घटना घडल्यानंतर तरी राजकारणाचे चित्र बदलेल का, असा प्रश्न कायम आहे. याचे उत्तर कदाचित होय, असे मिळेल याची खात्रीही नाहीच.
नेमके काय घडले?
सुरगाणा नगरपंचायतीमध्ये एकूण 17 जागा आहेत. या ठिकाणी सर्वाधिक आठ जागा मिळवत भाजप मोठा पक्ष ठरला आहे. त्यानंतर शिवसेनेने सहा, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने दोन आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एक जागा मिळवली आहे. देवळा येथेही भाजप एक नंबरचा पक्ष ठरला आहे. या ठिकाणी एकूण 17 जागा आहेत. त्यापैकी 15 जागा भाजपने मिळवल्या आहेत, तर अवघ्या दोन जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसला समाधान मानावे लागले आहे. या दोन्ही नगरपंचायतीमध्ये भाजपची सत्ता येण्याचा मार्ग अतिशय सुकर आहे. त्यासाठीच भाजपचे प्रयत्न सुरू झाले आहेत. त्यावरून राजकारणही टिपेला पोहचले आहे. सुरगाणा नगरपंचायतीत बहुमताचा आकडा गाठण्यासाठी भाजपने काढलेल्या सहली दरम्यान एका नगरसेविकेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. काशीबाई नामू पवार असे मयत नगरसेविकेचे नाव आहे.
कसा झाला मृत्यू?
सुरगाणा नगरपंचायतीत वार्ड क्रमांक 16 मधून नगरसेविका काशीबाई पवार निवडून आल्या होत्या. नगराध्यक्ष पदाच्या निवडीसाठी भाजपच्या गटातील नगरसेवकांसह नगरसेविकांची सहल काढण्यात आली होती. ऐनवेळी येवून आपले बहुमत जाहीर करण्याचा भाजपचा कल होता. मात्र, वापी येथे एका हॉटेलमध्ये थांबले असताना नगरसेविका काशीबाई पवार यांचा ह्रदविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. खुर्चीच्या राजकारणात नगरसेविकेला काळाने गाठल्याने भाजप पुन्हा एकदा वादात सापडले आहे.
सुरगाणा नगरपंचायत
– एकूण जागा – 17
– भाजप – 08
– शिवसेना – 06
– माकप – 02
– राष्ट्रवादी काँग्रेस – 01
इतर बातम्याः