Nashik Murder| 50 लाखांची मागणी बेतली डॉ. सुवर्णा वाजेंच्या जीवावर, चिठ्ठीतून काय झाला उलगडा?

डॉ. सुवर्णा वाजे यांना संदीपने एकदा गळा दाबून मारण्याचा प्रयत्न केला होता. त्यांनी ही सारी माहिती क्लिनिकमधील सहकाऱ्यांना सांगितली होती. संदीपकडे पोटगीसाठी पन्नास लाखांची मागणी केल्याचीही माहिती दिली होती. आपले कधी काही बरेवाईट झालेच, तर क्लिनिकमध्ये ठेवलेली चिठ्ठी पोलिसांना द्या, असे सांगितले होते.

Nashik Murder| 50 लाखांची मागणी बेतली डॉ. सुवर्णा वाजेंच्या जीवावर, चिठ्ठीतून काय झाला उलगडा?
डॉ. सुवर्णा वाजे यांचा खून पतीन संदीपनेच केल्याचे समोर आले आहे.
Follow us
| Updated on: Feb 13, 2022 | 1:16 PM

नाशिकः नाशिक (Nashik) महापालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सुवर्णा वाजे (Dr. Suvarna Waje) यांचा खून झाला. याप्रकरणी प्रमुख सूत्रधार त्यांचा पती संदीप वाजे असल्याचे समोर आले. संदीपने डॉ. सुवर्णा या दुसऱ्या लग्नात अडथळा ठरत होत्या. त्यांनी संदीपकडे 50 लाखांची मागणी केल्यामुळे त्यांचा खून (Murder) केल्याचे समजते. संदीपच्या गाडीमध्ये एक मोठा चाकू सापडला आहे. कदाचित त्याने या चाकूने डॉ. सुवर्णा वाजे यांचा खून केला असावा आणि त्यांना पेटवून दिले असावे, असा अंदाज पोलीस वर्तवत आहेत. हा चाकूही तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. याचा अहवाल आल्यानंतर खून प्रकरणाच्या गुढात आणखी उलगडा होऊ शकतो. विशेष म्हणजे डॉ. सुवर्णा वाजे खून झालेल्या दिवशी क्लिनिकमधून निघाल्या. तेव्हा त्यांची गाडी अनेक सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालीय. ते चित्रणही पोलिसांनी हस्तगत करून अजून तपास सुरू केलाय. शिवाय संदीपच्या साथीदाराच्या मागावरही ते आहेत.

50 लाखांची मागणी कशासाठी?

संदीप वाजेचे विवाह्यबाह्य संबंध होते. त्याला दुसरे लग्न करायचे होते. त्यामुळे त्याला डॉ. सुवर्णा वाजे यांचा अडथळा वाटायचा. संदीपच्या विवाह्यबाह्य संबंधाची डॉ. सुवर्णा वाजे यांना माहिती होती. त्यांनी संदीपला घटस्फोट देण्यासाठी 50 लाख रुपयांची मागणी केली होती. मात्र, त्याच्याकडे इतका पैसा नव्हता. यावरून त्यांच्यात वारंवार कौटुंबिक कलह सुरू होता. पती आणि पत्नींमध्ये नेहमी खटके उडायचे. दोघांमध्ये नेहमीच विकोपाला जाणारे वाद विवाद व्हायचे. त्यामुळे त्याने डॉ. सुवर्णा वाजे यांचा काटा काढायचे ठरवले.

मोबाईल डेटा मिळाला

डॉ. सुवर्णा वाजे यांच्या खुनाला पती संदीपने नियोजनबद्ध पद्धतीने मूर्त स्वरूप दिले. त्यांचा खून करून इतर पाच जणांना सोबत घेत पत्नीला जाळले. याप्रकरणी डॉ. सुवर्णा वाजे यांच्या बहीण आणि रुग्णालयातील सहकाऱ्यांचे जबाब नोंदवले आहेत. माहेरच्या नातेवाईकांनीही त्यांना काही महत्त्वाची माहिती दिली. त्यावरूनच पोलिसांनी मुख्य आरोपी डॉ. सुवर्णा वाजे यांचा पती संदीपला बेड्या ठोकल्या आहेत. दुसरीकडे संदीपने मोबाईलमधील डेटा डिलीट केला होता. तो रिकव्हर झाला असून, त्यातूनही त्यांच्यात भांडण आणि वाद सुरू असल्याचे समोर आले आहे.

क्लिनिकमध्ये ठेवली चिठ्ठी

डॉ. सुवर्णा वाजे यांना संदीपने एकदा गळा दाबून मारण्याचा प्रयत्न केला होता. त्यांनी ही सारी माहिती क्लिनिकमधील सहकाऱ्यांना सांगितली होती. संदीपकडे पोटगीसाठी पन्नास लाखांची मागणी केल्याचीही माहिती दिली होती. आपले कधी काही बरेवाईट झालेच, तर क्लिनिकमध्ये ठेवलेली चिठ्ठी पोलिसांना द्या, असे सांगितले होते. त्यावरून डॉ. सुवर्णा वाजे यांच्या सहकाऱ्यांनी ही माहिती आणि चिठ्ठी पोलिसांना दिली आहे. त्यातून या साऱ्या प्रकरणाचा अजून खोलवर उलगडा झाला आहे.

शेवटचे बोलणे संदीपलाच

डॉ. सुवर्णा वाजे या महापालिकेच्या श्री स्वामी समर्थ रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होत्या. कोविडच्या काळात त्यांनी अतिशय चांगली कामगिरी बजावली. महापालिकेत स्वतःच्या कार्याची वेगळी छाप पाडली. त्यामुळे पालिकेमध्ये त्यांचा आदरयुक्त दबदबा होता. विशेष म्हणजे 25 जानेवारी रोजीही त्यांनी ‘ओपीडी’मध्ये काम केले. त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर कसलेही टेन्शन नव्हते. यादिवशी बेपत्ता होण्यापूर्वी त्यांनी शेवटचा फोन पती संदीपलाच केल्याचे समोर आले आहेत. त्यावरून पोलिसांनी तपासाला गती दिली आणि मास्टरमाईंड असलेल्या संदीप वाजेलाच बेड्या ठोकल्या आहेत.

इतर बातम्याः

महाराष्ट्राचा महापिता कर्नाटकाच्या मातीत एकाकी, समाधीवर साधे छप्परही नाही; पानिपतकारांच्या डोळ्यांत पाणी, पोटात गोळा!

Kumar Vishvas Birth Day Special | सृजन का बीज हूँ, जाया हो नही सकता, 10 वर्ष राजकारण, हजारो वर्ष कविता!!

Lata Mangeshkar | चैतन्याची परी, सांध्यपर्वातील वैष्णवी, हृदयामधल्या निशिगंधाचे फूल; लतादीदींच्या आठवणींचा मोहक कोलाज!

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.