नाशिकच्या आश्रम शाळेत पुन्हा एका चिमूकल्याचा मृत्यू; मुलाचा मृतदेह पाहून आईने फोडला हंबरडा, काय घडलं?
नाशिक त्र्यंबकेश्वर येथील आश्रम शाळेत मुलाचा अचानक मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये घातपाताचा संशय व्यक्त केला जात असून त्याबाबत मुलाच्या पालकांनी चौकशीची मागणी केली आहे.
नाशिक : नाशिक मधील एका शाळेत सहा वर्षीय मुलाचा अचानक मृत्यू झाल्याने पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. खरंतर मागील काही महिन्यांपूर्वी आश्रम शाळेतील मुलांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला होता. एका विद्यार्थ्याचा खून झाल्याची बाब समोर आल्याने आश्रम शाळेच्या बाबत चौकशी करण्यात आली होती. त्यामध्ये धक्कादायक बाब म्हणजे अनेक आश्रम शाळांच्या नोंदी नसल्याचे उघड झाले होते. तर नाशिकच्या म्हसरूळ येथील आश्रम शाळेतील अनेक मुलीचे आश्रम शाळा चालवणाऱ्या व्यक्तीने शोषण केल्याचे समोर आले होते. त्यातच आता गाववरून आलेल्या मुलाचा मृत्यूने झाल्याची माहिती समोर आली आहे.
निवृत्ती वाळू चावरे हा सहा वर्षीय मुलगा त्र्यंबकेश्वर येथील आश्रम शाळेत शिक्षण घेत होता. पहिल्याच्या वर्गात शिकणारा निवृत्ती आपल्या गावी गेला होता. होळी सणासाठी गावी गेलेला निवृत्ती सोमवारी शाळेत परतला होता.
दिवसभर शाळेत मुलांसोबत वावरत होता. पण सायंकाळच्या वेळेला त्याला भोवळ आल्याचे सांगितले जात आहे. त्यानंतर निवृत्तीचा मृत्यू होतो. त्यानंतर त्याला त्र्यंबकेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते. आणि डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केल्याची माहिती समोर आली आहे.
आश्रम शाळेत सोडून आलेल्या मुलाचा अचानक मृत्यू झाल्याची बाब आईला समजताच आईने हंबरडा फोडला. मुलाचा मृत्यू कसा काय होऊ शकतो म्हणून चौकशीची मागणी केली आहे . यामध्ये मुलाचा नेमका मृत्यू कोणत्या कारणाने झाला याबाबत अद्याप स्पष्टता नसली तरी नाशिकमध्ये खळबळ उडाली आहे.
निवृत्तीच्या मृत्यूची माहिती मिळताच संपूर्ण कुटुंबाने ग्रामीण रुग्णालयात धाव घेलती होती. यावेळी निवृत्तीचा मृत्यू कोणत्या कारणाने झाला अशी विचारणा करत आहे. यामध्ये त्र्यंबकेश्वर पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद केली आहे.
अचानक घडलेल्या या घटनेने चावरे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. शालेय परिसरात देखील भीतीचे वातावरण निर्माण झाले असून भोवळ येऊन निवृत्तीचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.