कानडी ब्रोकरने महाराष्ट्रातील नागरिकांना लावला चुना, कोट्यवधी रुपयांना पाहा कसा गंडा घातला, प्रकरण गेलं पोलिस ठाण्यात…

कर्नाटक मधील दोघांनी नाशिकमधील एका व्यक्तीला कोट्यवधी रुपयांना गंडा घातला आहे. बड्या कंपनीचे प्रमाणपत्र दाखवून विश्वास संपादन करत केलेली फसवणूक चर्चेचा विषय ठरत आहे.

कानडी ब्रोकरने महाराष्ट्रातील नागरिकांना लावला चुना, कोट्यवधी रुपयांना पाहा कसा गंडा घातला, प्रकरण गेलं पोलिस ठाण्यात...
Image Credit source: Google
Follow us
| Updated on: Mar 20, 2023 | 5:58 PM

नाशिक : फसवणूक करण्यासाठी भामटे नवनवीन शक्कल लढवत असतात. यामध्ये जर काही ऑनलाइन बाबी असतील तर मग फसवणूक होण्याची शक्यता अधिक निर्माण झालेली असते. त्यामध्ये तर अधिक पैशांचे आमिष दाखवले तर अनेक जण फसवणुकीला बळी पडल्याचे समोर आले आहे. असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला असून नाशिकच्या देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये दोन्ही संशयित हे कर्नाटक मधील असून त्यांनी सव्वा कोटी रुपयांच्या वर रकमेची फसवणूक केली आहे. शेयर मार्केटमधील पैशांवर व्याजाचे आमिष दाखवून ही फसवणूक केली आहे.

शेयर मार्केट बद्दल अनेकांना माहिती नसते. त्यासाठी अनेक जण हे ब्रोकरला प्राधान्य देत असतात. असाच कर्नाटक येथील दोन भामटयांनी नाशिकमधील व्यक्तीची सव्वा कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा देवळाली पोलिस ठाण्यात करण्यात आला आहे.

देवळाली पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात एक कोटी 38 लाख रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. शेयर बाजारातील आर्थिक गुंतवणुकीच्या रकेमवर चार टक्के इतका परतावा मिळेल असे आमिष दाखविले होते.

हे सुद्धा वाचा

भगरू येथील रहिवासी असलेले संजय सदानंद बिन्नर यांनी देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात दीलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये कर्नाटक येथील युवराज बाळकृष्ण पाटील आणि राहुल शंकर गौडा यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

संशयित आरोपी यांनी तक्रारदार बिन्नर यांना 2020 मध्ये काही प्रसिद्ध कंपन्यांचे ब्रोकरचे प्रमाणपत्र दाखविले होते. त्यामध्ये अधिकृत ब्रोकर असल्याचे भासवत बिब्बर यांना गंडा घातला आहे. चार टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवू विश्वास संपादन करत फसवणूक केली आहे.

यामध्ये वारंवार पैसे मागवूनही पैसे मिळत नसल्याने आपली फसवणूक झाल्याची बाब समोर आली. त्यानंतर बिन्नर यांनी दोघांच्या विरोधात तक्रार दिली आणि त्यावरून देवळाली कॅम्प पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिकचा तपास केला जात आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.