तिच्या अंगावरची हळद फिटली नव्हती, लग्नाच्या चौथ्याच दिवशी घडली दुर्दैवी घटना, ऐकून डोळ्यातच पाणी येईल…

लग्न होऊन अवघे चार दिवस झाले होते. संपूर्ण कुटुंब आनंदात होते. कुणी नाचत होते तर कुणी नवरी मुलीकडे पाहत होते. अंगावरील हळद फिटली नव्हती अशातच दुर्दैवी घटना घडली आहे.

तिच्या अंगावरची हळद फिटली नव्हती, लग्नाच्या चौथ्याच दिवशी घडली दुर्दैवी घटना, ऐकून डोळ्यातच पाणी येईल...
Image Credit source: Google
Follow us
| Updated on: Mar 24, 2023 | 12:07 PM

नाशिक : लग्न म्हंटलं की घरात आनंदाचे वातावरण असते. लहान मुलांचा किलबिलाटही मोठा असतो. दाराला तोरण असतं. नातेवाईकांची गर्दी असते. असाच काहीसा सोहळा नाशिकच्या येवला तालुक्यात एक विवाह 17 मार्चला विवाह झाला होता. मोठ्या थाटामाटात विवाह पार पडल्यानंतर नव दाम्पत्य सुखी संसाराचे स्वप्न पाहत होते. नुकतीच लग्नगाठ बांधली असल्याने अंगावरची हळदही फिटली नव्हती. अशातच सासरी गेलेली नव वधू आनंदात होती. नवरी घरात असल्याने जल्लोषाचे वातावरण होते. मात्र अचानक सर्वजण शोकसागरात बुडाले.

सुखी संसार सुरू होण्यापूर्वीच त्यात विरजण पडले. नवरी मुलीचा अचानक मृत्यू झालाअ. संपूर्ण वातावरणच बदलून गेले होते. उंबरा ओलांडून आनंदात असलेली नवरी अचानक मृत्यूमुखी पडल्याने संपूर्ण कुटुंब शोकसागरात बुडाले.

पूनम सोपान कोल्हे या अठरा वर्षीय नवरीचा लग्नाच्या चौथ्याच दिवशी आकस्मित मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. हडप सावरगाव येथील सुखेदव कोल्हे यांचा मुलगा सोपं यांच्यासोबत पूनम हिचा विवाह झाला होता.

हे सुद्धा वाचा

अचानक झालेल्या या घटनेने येवला तालुक्यातील हडप सावरगाव येथील कोल्हे आणि कोळम येथील चव्हाण कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. पूनम वर नुकतेच अंत्यसंस्कार करण्यात आले असून कुटुंबाचा आक्रोश अनेकांचे हृदय पिळवटून टाकणारा होता.

लग्न म्हंटलं की संपूर्ण घरात आनंदाचे वातावरण होते. मात्र अचानक नवरी मुलगीच मृत्यू पावल्याने संपूर्ण येवला तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. नवरी मुलीच्या अंगावरील हळद फिटली नव्हती त्यातच ही दुर्दैवी घटना घडल्याने दोन्ही कुटुंब शोकसागरात बुडाले आहे.

सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....