जेवण झाल्यावर तुम्ही शतपावली करत आहात? ठरू शकतो शेवटचा दिवस; कारण ऐकून तुम्हाला धक्काच बसेल, CCTV पाहा…

नाशिकच्या नाशिकरोड पोलिस ठाण्यात एक गुन्हा दाखल झाला आहे. यामध्ये धक्कादायक घटना समोर आली असून त्यानंतर त्या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आल्यानं हळहळ व्यक्त केली जात आहे.

जेवण झाल्यावर तुम्ही शतपावली करत आहात? ठरू शकतो शेवटचा दिवस; कारण ऐकून तुम्हाला धक्काच बसेल, CCTV पाहा...
Image Credit source: TV9 Network
Follow us
| Updated on: Apr 27, 2023 | 12:08 PM

नाशिक : रात्रीच्या वेळेला जेवण झाल्यावर अनेकांना शतपावली करण्याची सवय झालेली असते. असेच दररोजच्या प्रमाणे नाशिकच्या रस्त्याच्या कडेने शतपावली करण्यासाठी जेलरोड परिसरात काही महिला बाहेर पडलेल्या होत्या. रस्त्याच्या कडेने जात असतांना अचानक अशी काही घटना घडलीय की संपूर्ण नाशिक शहरात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाली आहे. या घटनेनंतर महिला वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. एका महिलेचा नाहक बळी गेला असून एक सहा वर्षाचा मुलगा गंभीर जखमी आहे.

जेलरोड परीसरात काही महिला नेहमीप्रमाणे जेवण झाल्यावर रस्त्याच्या कडेला शतपावली करत होत्या. अशातच पाठीमागून भरधाव वेगाने दुचाकीने धडक दिल्याने एका महिलेचा मृत्यू तर सह वार्षिक बालक जखमी झाला आहे.

हे सुद्धा वाचा

या घटनेनंतर नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामध्ये पोलिसांकडून अधिकचा तपास केला जात असला तरी या घटनेचे सीसीटीव्ही समोर आल्याने अनेकांना धक्का बसला आहे.

आदर्श सोसायटी, कॅनाल रोड, येथील रहिवासी महिला करुणा अशोक जोगदंड, रंजना हिरे, मंगल निकम, रुजिता पगारे, रेखा दुबे,सोनाली विनीत उन्हवणे आणि सहा वर्षीय मुलगा इशांत उन्हवणे हे पाण्याच्या टाकीच्या परिसरात शतपावली करत होत्या.

शिवाजी नगर कडे जेवण करून शतपावली करत असतांना पाठीमागून आलेल्या दुचाकीने धडक दिली. या धडकेत करुणा अशोक जोगदंड यांना जबर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला तर सह वर्षीय ईशांत जखमी झाला आहे.

करुणा अशोक जोगदंड यांना जबर दुखापत झाल्याने बिटको रुग्णालयात दाखल केले होते. मात्र डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले आहे. दरम्यान या घटनेत सोनाली उन्हवणे यांनी नाशिकरोड पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खरंतर करुणा जोगदंड यांच्या पतीचा कोरोना कळत मृत्यू झाला होता. दीड वर्षापूर्वी ही घटना घडल्यानंतर आता स्वतः करुणा यांचा मृत्यू झाल्यानंतर पंचक्रोशीत हळहळ व्यक्त केली जात आहे.

... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ
... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ.
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी.
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?.
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?.
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?.
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर.
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?.
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?.
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.