Nashik Crime : दर्शनासाठी आला आणि मुकुट घेऊन फरार झाला, ‘तो’ आरोपी पोलिसांच्या जाळ्यात कसा सापडला ?

आरोपी आधी देवळात आला, रीतसर दर्शन घेतले, मनोभावे प्रार्थना करून नमस्कारही केला. मात्र त्यानंतर त्याने जे केलं ते पाहून सर्वच हादरले. हा संपूर्ण प्रकार देवळातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला. त्याआधारे पोलिसांनी आरोपीचा माग काढण्यास सुरूवात केली.

Nashik Crime : दर्शनासाठी आला आणि मुकुट घेऊन फरार झाला, 'तो' आरोपी पोलिसांच्या जाळ्यात कसा सापडला ?
Follow us
| Updated on: Sep 27, 2023 | 11:49 AM

नाशिक | 27 सप्टेंबर 2023 : मनी नाही भाव, म्हणे देवा मला पाव.. हे तर सर्वांनाच माहीत आहे. आपण सगळेजण देवाच्या पाया पडतो ना, तेव्हा मनात काही ना काही इच्छा ठेऊनच, काहीतरी मागण्यासाठीच जातो. मनुष्यस्वभावच आहे म्हणा तो. पण नाशिकमध्ये एका इसमाने तर हद्दच केली. तो माणूस आधी देवाच्या पाया पडला, त्याला नमस्कारही केला पण त्यानंतर त्याने जे काही केलं ते पाहून सर्वांचे डोळेचे विस्फारले. देवाला नमस्कार करून त्याने थेट देवाच्या शीरावरील मुकुट चोरला ( theft case) आणि तो फरार झाला ना राव…

नाशिकच्या पंचवटी येथील पंचमुखी हनुमान मंदिरातील श्रीकृष्ण मूर्तीचा चोरीला (crown theft from temple) गेल्याची ही धक्कादायक घटना गेल्या आठवड्यातच घडली होती. थेट देवळातच चोरी झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात होते. चोरट्यांनी देवालाही सोडले नाही, अशी चर्चा देखील सुरू झाली. हा सर्व धक्कादायक प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्येही कैद झाला होता. तेव्हापासूनच त्या चोरट्याच्या शोधार्थ पोलिस कसून तपास करत होते. अखेर त्या आरोपीला जेरबंद करण्यात पोलिसांना यश मिळाले असून त्याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. किरण गांगुर्डे (वय २९) असे त्याचे नाव असल्याची माहिती समोर आली आहे.

नाशिक शहरात चोरीच्या घटना खूप वाढल्या असून त्यामुळे नागरिक त्रस्त झाले होते. पोलिसांचा वाढता बंदोबस्त असून देखील चोरीच्या घटनांना आळा बसत नव्हता. आणि त्यातच चक्क देवळातही चोराने त्याचा प्रताप दाखवल्याने एकच संताप व्यक्त होत होता. शहरातील नागरिक तर नाहीच पण आता देवही सुरक्षित नाहीत का असा संतप्त सवाल सर्वत्र विचारण्यात येत होता.

आधी घेतले दर्शन नंतर मुकूट चोरून झाला फरार

गेल्या आठवड्यात नाशिकच्या पंचवटीतील पंचमुखी हनुमान मंदिरातील श्रीकृष्ण मूर्तीचा मुकूट चोरीला गेला होता. रात्रीच्या सुमारास ही चोरी झाली. चोरटा इसम आधी मंदिरात आला, त्याने देवाचे मनोभावे दर्शन घेतले. रीतसर नमस्कारही केला. मात्र त्यानंतर त्याने थेट मूर्तीच्या मुकूटालाच हात घातला. श्रीकृष्णाच्या मूर्तीवरील चांदीचा मुकूट त्याने काढून घेतला आणि तो देवळातून बाहेर पडून फरार झाला. हा सर्व प्रकार देवळामध्ये असलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला होता.

दुसऱ्या दिवशी सकाळी देवळाचे दरवाजे उघडल्यावर मूर्तीवरील मुकूट दिसत नसल्याने एकच खळबळ उडाली. सीसीटीव्ही फुटेज चेक केले असता चोरट्याचा सर्व प्रताप त्यामध्ये दिसला. . याबाबत पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होताच पथकाने सीसीटीव्हीत कॅप्चर झालेल्या फुटेजच्या आधारे संशयिताचा माग काढण्यास सुरूवात केली. हे प्रकरण अतिशय संवेदनशील असल्याने चोराचा तत्काळ शोध घेण्यासाठी पोलिस पथक कामाला लागले. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयित चोराचा माग काढण्यात आला. आरोपी हा गणेशवाडी येथे आल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तेथे सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेण्यात आली असता, त्याच्याकडून १५० ग्राम वजनाचा १५ हजार रुपये किंमतीचा मुकुट जप्त करण्यात आला. त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे, असे पोलिसांनी सांगितले.

हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.