उद्योजक कौशिक यांच्या मृत्यूचं गूढ वाढलं, अपघात की घातपात? पोस्टमॉर्टेमचा रिपोर्ट काय सांगतोय?

बडे उद्योजक म्हणून महाराष्ट्रभर ओळख असलेले आशिष कौशिक यांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली होती. त्यातच त्यांचा घातपात की अपघात याबाबत पोलिसांना मोठा संशय आला आहे.

उद्योजक कौशिक यांच्या मृत्यूचं गूढ वाढलं, अपघात की घातपात? पोस्टमॉर्टेमचा रिपोर्ट काय सांगतोय?
Image Credit source: Google
Follow us
| Updated on: Mar 22, 2023 | 4:32 PM

नाशिक : गेल्या काही दिवसांपूर्वी नाशिक शहरातील नामांकित उद्योजक आशिष कौशिक यांचा मृत्यू झाल्याची बाब समोर आली होती. त्यानंतर आशिष कौशिक यांचा मृत्यू होण्यापूर्वी आशिष कौशिक यांनी आपल्या पत्नीसह मुलावर चाकूने हल्ला केल्याची घटना घडली होती. त्यामध्ये आशिष कौशिक यांच्या मित्रांना मुलगा देव कौशिक याने वडिलांनी चाकूने हल्ला केल्याची माहिती दिली होती. लागलीच त्यांचे मित्र आश्विननगर येथील घरी पोहचल्यावर पत्नीसह मुलगा बेशुद्ध अवस्थेत आढळून आले होते. त्यानंतर लागलीच आशिष कौशिक यांच्या मित्रांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आशिष कौशिक यांचाच मृत्यू झाल्याची बाब समोर आल्यानं खळबळ उडाली होती.

आशिष कौशिक यांच्या नाशिकमध्ये दोन ते तीन कंपन्या आहे. आशिष हे मूळचे औरंगाबाद येथील असल्याची माहिती असून ते व्यवसायासाठी नाशिक येथे काही वर्षांपासून राहत होते. आशिष कौशिक हे व्यावसायिक म्हणून चांगले व्यक्ती असल्याही माहिती समोर आली आहे.

आशिष यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले होते. त्यानंतर त्यामध्ये त्यांच्या पोटावर आणि पाठीवर काही व्रण आढळून आले होते. त्यावरून पोलिसांना त्यांचा अपघात आहे की घातपात याबाबत संशय निर्माण झाला होता.

हे सुद्धा वाचा

त्यानंतर नाशिक पोलिसांनी व्हिसेरा रिपोर्ट राखून ठेवला असून फॉरेन्सिक अहवाल मागविला आहे. काही तांत्रिक बाबी नाशिकचे अंबड पोलिस शोधत असून लवकरच आशिष कौशिक यांचा अपघात की घातपात याची स्पष्टता होणार आहे.

आशिष यांच्या पत्नी आणि मुलाचाही जबाब नाशिक पोलिस घेणार आहे. विशेष म्हणजे ज्या मित्रांनी मदत केलीय त्यांची चौकशी केली जाण्याची शक्यता आहे. आशिष यांनी हल्ला केल्यानंतर त्यांचा मृतदेह अचानक आढळून कसा आला यावरुनच पोलिसांना घातपाताचा संशय आला होता.

आशिष यांचा घातपात झाल्याचा पोलिसांना दाट संशय असला तरी दुसऱ्या बाजूला आशिष यांना अतितणाव सहन होत नव्हता. त्यातूनच त्यांनी हल्ला केल्याचेही पत्नी आणि मुलाने सांगितले होते. त्यामुळे त्या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या तपासात कोणत्या बाबी समोर येतात हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.

Non Stop LIVE Update
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला.
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले..
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले...
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी.
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.