नर्सला गुंगीच्या गोळ्या देऊन तिच्यासोबत नको ते कृत्य करत होता; नंतर त्याचे संतापजनक कृत्यही समोर आलं, आरोग्य विभागात खळबळ

कामाच्या ठिकाणी आधी मैत्री झाली, मैत्रीचे रूपांतर नंतर प्रेमात झाले. मात्र, त्यानंतर महिला विवाहित असल्याचे माहित असूनही लग्नाची अट तरुणाने घातली. महिलेने नकार दिल्यानंतर धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

नर्सला गुंगीच्या गोळ्या देऊन तिच्यासोबत नको ते कृत्य करत होता; नंतर त्याचे संतापजनक कृत्यही समोर आलं, आरोग्य विभागात खळबळ
चारित्र्याच्या संशयातून पतीने पत्नीला संपवलेImage Credit source: TV9 Network
Follow us
| Updated on: Mar 20, 2023 | 2:07 PM

नाशिक : कामाच्या ठिकाणी महिला आणि पुरुषांमध्ये चांगली मैत्री होत असते. कधी कधी या मैत्रीचे प्रेमात रूपांतर होत असते. अविवाहित असल्यास काहींचे लग्न होतात किंवा काहींचे प्रेमसंबंधापर्यन्तच हा विषय राहतो. यामध्ये काही ठिकाणी तर विवाहित पुरूषांचे तरुणीसोबत प्रेमसंबंध होतात. तर काही वेळेला विवाहित महिलांचे तरुण मुलांसोबत प्रेमसंबंध होतात. अशा अनेक घटना समोर आल्या आहेत. खरंतर या घटना पोलिस ठाण्यापर्यन्त पोहचल्या की मगच समोर येत असतात. अशी एक घटना नाशिकमध्ये समोर आली आहे. विवाहित नर्ससोबत सहकारी असलेल्या एका तरुणाचे प्रेमसंबंध असल्याचा प्रकार समोर आला असून त्या दरम्यान घडलेली घटना धक्कादायक आहे.

नाशिकच्या मुंबई नाका पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एका खाजगी रुग्णालयातील दोन कर्मचाऱ्यांमधील ही धक्कादायक बाब आहे. यामध्ये पीडित नर्स आणि संशयित मनोज यशवंत जगताप यांच्यात मैत्री झाली होती. त्यानंतर त्यांच्या प्रेमसंबंध झाले.

हळूहळू संशयित तरुणाचे नर्सवर अधिक प्रेम वाढत गेले. मनोजच्या एका मित्राचा वाढदिवस असल्याने पीडित नर्सला निमंत्रित केले होते. त्यानंतर त्यांनी मनोजच्या घरी कुणीही नसल्याचे पाहून घरी नेले. मात्र, त्यापूर्वीच वाटेत त्याने नर्सला गुंगीच्या गोळ्या खाण्यासाठी दिल्या होत्या.

हे सुद्धा वाचा

पीडित नर्सला घरी घेऊन जात संशयित मनोज जगताप याने घरी नेल्यावर तरुणीवर शारीरिक अत्याचार केले आणि नंतर तिचे अश्लील फोटो काढून घेतले. यामध्ये पीडित तरुणीला ही बाब काही लक्षात आली नाही.

नंतर एका भेटी दरम्यान मनोजने पीडित नर्सला लग्नाची मागणी केली. त्यावेळी पीडित नर्सने नकार दिला. मला दोन मुळे आहेत. माझे लग्न झाले आहे. मी लग्न करू शकत नाही म्हणून नकार दिला. त्यानंतर मनोजने नर्सवर लग्नासाठी दबाव आणला.

लग्नावरुन मनोज आणि पीडित नर्समध्ये वाद होऊ लागला. त्यानंतर मनोज ने रागाच्या भरात पीडित नर्सचे अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत ते नंतर व्हायरल सुद्धा केले. त्यानंतर महिलेने यामध्ये मुंबई नाका पोलिस ठाण्यात धाव घेत फिर्याद दिली आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.