Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुलासह पत्नीवर हल्ला करून ‘तो’ फरार झाला, बड्या उद्योजकाचा मृतदेह आढळून आल्यानं नाशकात खळबळ

नाशिकमधील बड्या उद्योजकाचा मृत्यू झाल्याची बाब समोर आली असून मृत्यू मागील कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. मात्र, पत्नीसह मुलावर हल्ल्या करण्यामागील कारण काय? याबाबत उलट सुलट चर्चा सुरू आहे.

मुलासह पत्नीवर हल्ला करून 'तो' फरार झाला, बड्या उद्योजकाचा मृतदेह आढळून आल्यानं नाशकात खळबळ
Image Credit source: Google
Follow us
| Updated on: Mar 17, 2023 | 10:06 AM

नाशिक : नाशिकमधील एका बड्या उद्योजकाचा मृत्यू छत्रपती संभाजीनगर येथील सिडको येथे झाल्यानं खळबळ उडाली आहे. कारण, काही दिवसांपूर्वी आशीष कौशिक यांनी आपल्या पत्नीसह मुलावर चाकूने हल्ला करून पळ काढला होता. त्यानंतर त्यांचा मृतदेह आढळून आल्याने उलटसुलट चर्चा होऊ लागली आहे. आशिष कौशिक हे आपल्या मुलासह पत्नीबरोबर आश्विननगर येथे राहत होते. त्यांचा नुकताच मृतदेह आढळून आला आहे. आशीष कौशिक हे मोठे उद्योजक असून माँटॅक्स ग्लास फायबर कंपनीसह आणखी काही कंपन्यांचे ते मालक होते. त्यांना हृदय विकाराचा झटका आला की आणखी काही कारणाने त्यांचा मृत्यू झाला आहे याचा शोध पोलिस घेत आहे.

आशीष कौशिक हे काही दिवसापूर्वी पत्नी ज्योती आणि मुलगा देवसह हल्लाकरून फरार झाले होते. मध्यरात्रीला आशीष यांनी बेडरूममध्ये पत्नीवर चाकूने वार केले होते. त्यानंतर हॉलमध्ये झोपलेल्या देवच्या हातावर त्यांनी वार केले. त्यावेळी देव खडबडून उठला आणि तितक्यात आशीष कौशिक यांनी पळ काढला.

देवने आपल्या आईकडे धाव घेताच आईदेखील बेशुद्ध पडलेली. तिच्यावरही चाकूने हल्ला झालेला होता. वडिलांनी केलेल्या कृत्याचा देव याने त्यांच्या मित्रांना कळवून माहिती दिली. त्यांनी लागलीच घरी धाव घेतली. मात्र त्यामध्ये दोघेही बेशुद्ध अवस्थेत दिसले.

हे सुद्धा वाचा

देव याने बऱ्याच लोकांना फोनवरून ही महिती दिली होती. त्यामध्ये वडील फरार झाले असल्याने त्यांनी तात्काळ पोलिसांना बोलावून दोघांना रुग्णालयात नेले. दोघांवर उपचार सुरू असतांना आशीष कौशिक यांचा मृत्यू झाल्याचे आढळून आले आहे.

ही संपूर्ण घटना संशयास्पद आढळून येत असल्याने पोलिसांकडून या घटनेचा तपास केला जात आहे. मात्र, हल्ला करण्यामागील कारण काय ? अचानक उद्योजक यांचा मृत्यू कसा झाला याबाबत नाशिकमध्ये उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.

बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट
बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट.
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच.
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले.
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम.
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत.
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर.
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले.
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक.
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?.
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल.