तब्बल पाच दिवस आयकर विभागाची चौकशी, कर चुकवेगिरी करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांची पळता भुई थोडी…

20 एप्रिलला नाशिक शहरात पहाटेच्या वेळेला दाखल झालेल्या आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाच दिवसांनी नाशिक सोडलं आहे. तब्बल पाच दिवसांच्या चौकशीत काय समोर आलं हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.

तब्बल पाच दिवस आयकर विभागाची चौकशी, कर चुकवेगिरी करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांची पळता भुई थोडी...
Image Credit source: TV9 Network
Follow us
| Updated on: Apr 25, 2023 | 7:23 PM

नाशिक : पाच दिवसांपूर्वी नाशिक शहरासह ग्रामीण भागात जवळपास पन्नासहून अधिक आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापेमारी केली होती. त्यामध्ये जवळपास पंधराहून अधिक कर चुकवणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांची चौकशी सुरू होती. तब्बल पाच दिवस आयकर विभागाचे अधिकारी तळ ठोकून होते. यामध्ये राज्यातील तीन विभागातील कार्यालयातील अधिकारी चौकशीसाठी आले होते. नाशिक शहरातील बांधकाम व्यावसायिकांच्या कार्यालयावर, घरावर छापा टाकल्याने खळबळ उडाली होती. कर चुकवेगिरी करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांचे धाबे यामुळे चांगलेच दणाणले होते. त्यात तब्बल पाच दिवस चौकशी झाल्याने चौकशी नेमकं काय आढळून आलं ? यावरून उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.

नाशिकमधील बांधकाम व्यावसायिकांची आयकर विभागाकडून सुरू असलेली चौकशी पूर्ण झाल्याची माहिती समोर येत आहे. यामध्ये 20 एप्रिलला पहाटेच्या सुमारास 15 हून अधिक व्यावसायिकांवर छापे पडले होते.

आज सहाव्या दिवशी पहाटेच्या सुमारास आयकर विभागाचे पथकांनी चौकशी पूर्ण झाल्यानंतर माघारी फिरले आहे. या चौकशीत नाशिकसह, संभाजीनगर, पुणे , मुंबई, नागपूर या ठिकाणाहून जवळपास 100 हून अधिक आयकर अधिकारी व कर्मचारी नाशिकमध्ये दाखल झाले होते.

हे सुद्धा वाचा

कार्यालये, निवासस्थाने आणि ईतर ठिकाणी झाडाझडती करण्यात आली होती, चौकशीत आता काय समोर येते हे पहाण महत्वाचं असेल तरी आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांना पाच दिवसांत काही घबाड हाती लागले का? याशिवाय पाच दिवस इतकी कसली चौकशी सुरू होती याबाबत उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे.

नाशिक शहरातील बडे बांधकम व्यावसायिक आयकर विभागाच्या रडारवर असल्याने शहरात बांधकाम क्षेत्रात खळबळ उडाली आहे. त्यामध्ये महत्वाची बाब म्हणजे आयकर विभागाकडून काही कागदपत्रे देखील ताब्यात घेण्यात आले आहे. त्यामुळे आयकर विभाग याबाबत अधिकृत माहिती कधी आणि काय जाहीर करते याकडे लक्ष लागून आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.