रेल्वेतून फुकट प्रवास करायचे, लूट करण्याची भयानक पद्धत; रेल्वे पोलिसांच्या कारवाईत समोर आली धक्कादायक बाब
रेल्वेतून फुकटचा प्रवास करीत प्रवाशांमध्ये दहशत निर्माण करून लूट करणाऱ्या टोळीचा रेल्वे पोलिसांनी चांगलाच दणका दिला आहे. पाच जणांच्या टोळीचा जेरबंद केल्यानंतर धक्कादायक बाब समोर आली आहे.
नाशिक : गेल्या काही दिवसांपासून मध्यरात्रीच्या दरम्यान धावत्या रेल्वेतील लुटीच्या घटना वाढत असतांना मनमाड रेल्वे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. यामध्ये लूट करण्याची पद्धत पोलिस तपासात समोर आल्यानं खळबळ उडाली आहे. रेल्वेतून प्रवास हा सुरक्षित प्रवास मानला जातो. मात्र, रात्रीची संधी साधून काही टोळक्यांनी लूट करण्याची मोहीमच हाती घेलती होती. रेल्वे पोलिसांना काही तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. तेव्हापासून रेल्वे पोलिसांनी तपास सुरू केला होता. रेल्वेतील प्रवासादरम्यान गस्त वाढवून मोठी कारवाई केली आहे. त्यामध्ये पाच जणांना अटक करत त्यांच्याकडून मोबाइलसह आणि दगिन्यांसह रोख रक्कम हस्तगत केली आहे.
मनमाड-कोपरगावसह इतर ठिकाणी धावत्या रेल्वेत प्रवाशांना मारहाण करून ब्लेडसह इतर हत्याराचा दाख दाखवून लुटणाऱ्या पाच जणांच्या टोळीला मनमाड रेल्वे पोलिसांनी सापळा रचून जेरबंद केले आहे.
त्यांच्या कडून लुटण्यात आलेले 10 महागडे मोबाईल, चांदीचे दागिने आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. केशव होनाळे, यशराज उर्फ बंटी सातदिवे, अक्षय सावंत, प्रदिप पांचाळ आणि प्रदिप झिंगटे अशी या आरोपीची नावे आहे.
त्यांच्या विरुद्ध विविध कलमाअन्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक शरद जोगदंड यांनी दिली आहे. आरोपीनी आणखी किती आणि कुठे गुन्हे केले आहेत याचा पोलीस तपास करीत आहे.
रेल्वेत फुकट प्रवास करीत महिलांना आणि वृद्ध नागरिकांना लक्ष करीत लूट करणाऱ्या टोळीने लाखो रुपयांची लूट केली आहे. यामध्ये मोबाइल, दागिने आणि रोक रक्कम लुटण्यावर त्यांचा डोळा होता. गेल्या अनेक महिन्यांपासून या टोळीची दहशत प्रवाशांमध्ये होती. मात्र, पोलिसांनी केलेल्या कारवाईने मोठा दिलासा मिळणार आहे.