अखेर ‘तो’ भाई सापडलाच, वर्षभर महाराष्ट्रातील पोलिसांना गुंगारा देत होता, पॅरोलवर सुट्टीवर आला आणि…
नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहातून पॅरोल रजा घेऊन बाहेर पडलेला आरोपी वर्षभर पोलिसांना गुंगारा देत होता. नुकतीच नाशिकच्या गुंड विरोधी पथकाने ही कारवाई करत त्याला अटक केली आहे.
नाशिक : अनेक आरोपी हे तुरुंगातून पॅरोलवर बाहेर पडले की ते पुन्हा परत जात नाहीत. सुट्टीचा कालावधी संपल्यानंतर खरंतर आरोपी याने पुन्हा तुरुंगात हजर होणे अपेक्षित असते. मात्र, त्यानंतर काही जण नियमांचे पालन करून पुन्हा हजर होतात. पण काही जण हे फरार होतात. पोलिसांना कित्येक महीने गुंगारा देतात. त्यामुळे कारागृह प्रशासन आणि पोलिस प्रशासन यांची डोकेदुखी वाढत असते. अशीच डोकेदुखी नाशिकच्या पोलिसांची आणि जेलरोड येथे असलेल्या कारागृह प्रशासनाची वाढली होती. 45 दिवसांच्या सुट्टीवर आलेल्या आरोपीने तब्बल सुट्टी संपवून वर्षभर पोलिसांना गुंगारा देत होता. अंबड येथे नाशिक पोलिसांनी नुकत्याच त्याला बेड्या ठोकल्या आहेत.
नाशिकच्या मध्यवर्ती कारागृह येथून खुनाच्या गुन्ह्यात शिक्षा भोगत असेलेला आरोपी अनिल ऊर्फ आमिन भुलईकुमार भोई याला 2022 च्या एप्रिलमध्ये पॅरोलवर सुट्टी मिळाली होती. त्यानंतर तब्बल वर्षभर तो पोलिसांना गुंगारा देत होता.
45 दिवस अनिल भोई याने सुट्टीचा पुरेपूर आनंद घेतला. पण नंतर सुट्टी संपल्यावर कारागृहात हजर होणे अपेक्षित असतांना त्याने थेट पळ काढला. त्यामध्ये तो अंबड येथे लपून बसलेला असतांना नाशिक पोलिसांनी नुकत्याच ताब्यात घेतला आहे.
मुंबईतील चेंबूर येथे 2006 मध्ये त्याने खून केला होता. त्या गुन्ह्यात अनिल भोईला शिक्षा झाली होती. त्यानुसार तो नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत होता. भोई हा मूळचा ओडीसा येथील आहे.
खरंतर वर्षभरापूर्वी फरार झालेला आरोप नाशिक पोलिसांच्या हाती लागत नसल्याने त्यावेळी पुण्यातील शिरूर पोलिस ठाण्यात त्याच्या विरोधात गुन्हा डकल करण्यात आला होता. पॅरोल रजा संपवून हजर न झाल्याने शिरूरला गुन्हा दाखल करण्यात आला होता.
खरंतर संपूर्ण महाराष्ट्रातील पोलिस भोईचा शोध घेत होते. मात्र, त्याने इतर ठिकाणी पळून न जाता तो नाशिकमध्ये लपून बसल्याने अनेक दिवस पोलिसांच्या लक्षात आलेच नाही. ओडीसा पासून थेट मुंबईत त्याचा तपास सुरू होता.