थेट आयुक्तच असल्याचं सांगितलं, व्यावसायिकाला लावला लाखो रुपयांना चुना, प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले, नेमकं काय घडलं?

वडिलांशी ओळख असल्याचे पाहून तक्रार हळूहळू पैसे देत गेला. मात्र, अनेक महीने झाले काम होत नाही म्हणून चौकशी केली असता फसवणूक झाल्याची बाब लक्षात आल्याने पोलिसांत धाव घेत गुन्हा दाखल केला आहे.

थेट आयुक्तच असल्याचं सांगितलं, व्यावसायिकाला लावला लाखो रुपयांना चुना, प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले, नेमकं काय घडलं?
Image Credit source: Google
Follow us
| Updated on: Mar 24, 2023 | 1:08 PM

नाशिक : नाशिकच्या मुंबई नाका पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यानंतर नाशिक जिल्ह्यासह आदिवासी विभागात खळबळ उडाली आहे. थेट आदिवासी आयुक्त असल्याचे भासवूनच लाखो रुपयांना गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नाशिकच्या एका बड्या व्यावसायिकाला तीन लाखांना चुना लावल्याची बाब समोर आली आहे. यावरून आदिवासी विकास भवन पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. गंगापुर रोड येथील फोटो कॉपी व्यावसायिक वैभव प्रकाश देसाई यांनी तक्रार दाखल केली असून त्यावरून मुंबई नाका पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

तक्रारदार देसाई यांचे वडील आणि बनावट आदिवासी आयुक्त संशयित मनोज दत्तात्रय खोकले यांची ओळख होतो. आदिवासी आयुक्त कार्यालयातील एक कंत्राट दिलं जाणार असून ते माझ्याच हातात असल्याचा देसाई यांना सांगितले होते. खोकले हा मूळचा येवला तालुक्यातील आहे.

आदिवासी विभागातील फोटोकॉपीसह स्टेशनरीचे काम देतो म्हणून आमिष दाखविले होते. त्यासाठी काही अनामत रक्कम भरावी लागेल असे सांगण्यात आले होते. त्यानुसार तक्रारदार यांनी वडिलांची आणि खोकले यांची ओळख असल्याचे पाहून जवळपास तीन लाख रुपये दिले होते.

हे सुद्धा वाचा

आदिवासी विकास भवन मध्ये बोलावून खोकले याने देसाई यांना कामाच्या बद्दल माहिती दिली होती. नंतर पैसे दिल्यानंतर काही दिवसांनी काही शासकीय दस्ताऐवज करायचे आहेत म्हणून देसाई यांच्या सह्याही घेतल्या होत्या.

याच काळात खोकले हा आदिवासी आयुक्त आहे यासाठी त्याच्याकडे शासकीय ओळखपत्र होते ते त्याने विश्वास यावा याकरिता देसाई यांना दाखविले होते. त्यामुळे देसाई यांचा विश्वास बसला होता. त्यानंतर वेळोवेळी ऑनलाइन, एनईएफटी आणि रोख असे तीन लाख रुपये दिले होते.

दरम्यान काही महीने उलटून गेले तरी कुठलेही काम मिळत नसल्याने आणि खोकले याच्याकडून काहीही प्रतिसाद मिळत नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. मात्र, शासकीय अधिकारी सांगून फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे.

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.