चोर आले रे चोर आले… मळे परिसरात नुसतीच पळापळ; चोरीच्या घटनांनी जिल्हा हादरला, नेमकं काय घडलं?
परिसरात पुन्हा एकदा घरफोडी आणि चोरीच्या घटना समोर आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून पोलिसांची चिंता मात्र वाढली असून चोरट्यांना जेरबंद करण्याचे आव्हान उभे राहिले आहे.
नाशिक : नाशिकच्या ग्रामीण पोलिसांसमोरील सिन्नर परिसरातील घरफोडी रोखण्याचे आव्हान पुन्हा एकदा उभं राहिलं आहे. नुकत्याच झालेल्या घरफोडीच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. एकच रात्री चोरट्यांनी दोन ते तीन दुकानं फोडून माजी सैनिकांच्या घरात चोरी केली आहे. हजारो रुपयांची चोरी करून चोरट्यांनी पळ काढल्याने परिसरात पुन्हा एकदा खळबळ उडाली असून पोलिसांनी रात्रीची गस्त घालावी अशी मागणी होऊ लागली आहे. सुरक्षा दलांच्या माध्यमातून परिसरातील नागरिकांना दिलासा देण्याची गरज निर्माण झाली आहे.
सिन्नर तालुक्यातील वावी येथे शनिवारी मध्यरात्री घरफोडीच्या घटना समोर आल्या आहे. यामध्ये शॉपिंग सेंटर मधील दुकांनांचे कुलूप तोडून प्रवेश करत बॅटरी संच आणि विद्युत मोटारी चोरट्यांनी चोरून नेल्या आहेत. पप्पू काटे यांच्या येथे ही चोरी झाली आहे.
ही चोरी घटना करून पळ काढण्याऱ्या चोरांना वाटेत एका माजी सैनिकांचे घर लागले. चोरट्यांनी घरातून सुधाकर ताजणे यांच्या मुलाची 32 हजार रुपयांची पॅन्टच्या खिशातील रक्कम पळवली. त्यामध्ये शॉपिंग सेंटर आणि घरफोडीच्या घटनेतून जवळपास 3 लाखांच्यावरील मुद्देमाल चोरीला गेला आहे.
चोरट्यांनी चोरी करत असतांना सीसीटीव्ही कॅमेरा सुद्धा चोरून नेला आहे. त्यामुळे चोरी केल्यानंतरचे सर्व पुरावे चोरांनी आपल्या सोबत घेऊन गेले आहे. त्यामुळे हे चोरटे शोधण्याचे मोठे आवाहन पोलिसांसमोर उभे राहिले आहे.
नाशिकच्या विविध भागात चोरीच्या घटना घडत असतांना सिन्नरमध्ये एकदा चोरीचे घरफोडीचे सत्र सुरू झाल्यास थांबता थांबत नाही. त्यामुळे सिन्नर मध्ये चोरीचे सत्र पुन्हा सुरू तर झाले नाही ना अशी चर्चा होऊ लागली आहे.
काही दिवसांपूर्वी चोर आले पळापळा अशी गत झाली होती. त्यामध्ये नागरिक आणि पोलिसांची अक्षरशः दमछाक झाली होती. त्यामुळे पोलिसांसमोरील चिंता पन्हा एकदा वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नाशिक ग्रामीण पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल करून घेत तपास सुरू केला आहे.