हाकेच्या अंतरावर पोलीस आयुक्तालय, दोन कोयताधारी गुंडांचा धिंगाणा, हा राडा पोलिसांच्या कानावर गेला की नाही?

पोलिस आयुक्तालयापासून हाकेच्या अंतरावर सराईत गुंडांनी घातलेला धिंगाणा सध्या शहरात चर्चेचा विषय ठरत आहे. त्यामुळे गुन्हेगार आता नागरिकांबरोबर पोलिसांना आव्हान देऊ लागले आहे.

हाकेच्या अंतरावर पोलीस आयुक्तालय, दोन कोयताधारी गुंडांचा धिंगाणा, हा राडा पोलिसांच्या कानावर गेला की नाही?
Image Credit source: Google
Follow us
| Updated on: Mar 23, 2023 | 10:03 AM

नाशिक : शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीने चांगलंच डोकं वर काढलं आहे. यामध्ये गुन्हेगारी थेट पोलिस आयुक्तालयापासून हाकेच्या अंतरावर येऊन ठेपली आहे. पोलिस आयुक्तालयापासून काही मीटर अंतरावर दोघा तरुणांनी हातात कोयता घेऊन दुचाकी आणि सीसीटीव्हीची तोडफोड करत धिंगाणा घातला आहे. मध्यरात्री झालेल्या या घटनेने परिसरातीळ नागरिकांच्या मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दोन्हीही संशयित सराईत गुन्हेगार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहे. या प्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सराईत गुन्हेगार हर्षद सुनील पाटणकर आणि यश शिंदे असे दोघा संशयित आरोपींचे नावे आहेत. यामध्ये हर्षद पाटणकर हा शरणपुर रोड येथे राहणारा असून यश शिंदे हा वडाळा नाका परिसरात राहणारे आहे.

आयुक्तालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या मल्हार खान येथे येऊन दहशत पसरविण्याचा प्रयत्न केला होता. त्यामध्ये एक रिक्षा आणि दुचाकीची तोडफोड केली असून हातात कोयता घेऊन फिरत होते.

हे सुद्धा वाचा

मल्हार खान परिसरात राहणाऱ्या राजू गायकवाड यांनी दिलेल्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मल्हार खान परिसर म्हणजे अगदी पोलिस आयुक्तालयाच्या समोरील भाग आहे.

त्यामुळे एक प्रकारे सराईत गुंडांनी पोलिसांना आव्हान दिल्याची चर्चा होऊ लागली आहे. गुन्हा दाखल झाला असला तरी अद्याप आरोपी हाती लागलेले नाही. त्यामुळे पोलिस आता गुन्हेगारांनी दिलेले आव्हान मोडून काढतात का? हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.

तर दुसऱ्या बाजूला शहरात गोळीबार, पैसे चोरी, जाळपोळ आणि कोयता घेऊन फिरणारे सराईत गुन्हेगार यांचा मोठ्या प्रमाणात उच्छाद वाढला आहे. त्यामुळे पुढील काळात पोलिस कशी कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Non Stop LIVE Update
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी.
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.