AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धक्कादायक, निवृत्त मुख्याध्यापकाकडून पत्नीचा खून, दुसरीकडे हायवे वर प्रवाशांना लुटलं, महिलांना मारहाण

महाराष्ट्रात दोन धक्कादायक घटना घडल्या आहेत. एका निवृत्त मुख्याध्यापकाने टोकाचं पाऊल उचललं. त्याने पत्नीचा खून केला नंतर स्वत:च जीवनही संपवलं. दुसरीकडे महाराष्ट्रातील एका हायवे वर प्रवाशांना लुटण्यात आलं. महिलांना मारहाण करण्यात आली.

धक्कादायक, निवृत्त मुख्याध्यापकाकडून पत्नीचा खून, दुसरीकडे हायवे वर प्रवाशांना लुटलं, महिलांना मारहाण
crime news Image Credit source: Pexels
| Updated on: Apr 10, 2025 | 8:12 AM
Share

नाशिकच्या जेलरोड परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. निवृत्त मुख्याध्यापकाने पत्नीचा गळा दाबून खून केला. पत्नीला मारल्यानंतर त्याने स्वतः गळफास घेतला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मुरलीधर जोशी (78) व लता जोशी अशी मृतांची नाव आहेत. दोघेही निवृत्त शिक्षक आहेत. या जोडप्याची दोन मुलं मुंबईत उच्चपदस्थ अधिकारी आहेत. नाशिक येथे मुरलीधर जोशी व लता जोशी अपार्टमेंटमध्ये दोघेच राहत होते. लता जोशी यांना 2017 पासून मेंदू विकाराचा त्रास होता. एकदा व्हेंटिलेटरवरही होत्या.

दीर्घ आजारपणामुळे हे दांपत्य कंटाळलं होतं, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत मुरलीधर जोशी यांनी म्हटलं आहे की, “पत्नीला स्वर्गलोकी पाठवले, आता तिच्यासोबत जात आहे. आमच्या मृत्यूला कोणीही जबाबदार नाही” पोलिसांकडून तपास सुरू आहे. परिसरात हळहळ आणि शोक व्यक्त होत आहे.

दुसरी घटना, हायवे वर प्रवाशांची लूट

दुसरीकडे सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गवर चारचाकी गाड्या अडवून प्रवाशांना मारहाण करत लुट केल्याची घटना घडली आहे. तुळजापूर आणि धाराशिवच्यामध्ये कावलदरा येथील परिसरात पहाटे 4 ते 5 च्या दरम्यान घटना घडली. जवळपास 4 ते 5 गाड्यांना अडवून त्यातील महिला व प्रवासी यांना मारहाण करण्यात आल्याची माहिती. सोने, मोबाईल व इतर वस्तू चोरुन प्रवाशांना मारहाण केल्याची माहिती. 5 ते 6 जणांच्या टोळीने ही लूट केली असून पोलिसांकडून घटनास्थळाची पाहणी सुरु आहे.

गाड्या कशा अडवल्या?

गुन्हा दाखल झाला असून तपास सुरु आहे. धावत्या वाहनासमोर लोखंडी वस्तू टाकून गाड्या अडवण्यात आल्या. टायर फोडून आतील प्रवाशांची लूट करण्यात आली. पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू आहे.

BJP पदाधिकाऱ्याचं अजब कांड, मतदारांना पैशांचे आमिष दाखवलं अन् कोंडून..
BJP पदाधिकाऱ्याचं अजब कांड, मतदारांना पैशांचे आमिष दाखवलं अन् कोंडून...
मोदी ऑन बोर्ड E-Mail चा उल्लेख अन्...पृथ्वीराज चव्हाणांचा सनसनाटी दावा
मोदी ऑन बोर्ड E-Mail चा उल्लेख अन्...पृथ्वीराज चव्हाणांचा सनसनाटी दावा.
मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली
मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली.
मोदी आणि एपस्टीनचं काय नातं? एपस्टीन प्रकरणावरून चव्हाणांचा थेट सवाल
मोदी आणि एपस्टीनचं काय नातं? एपस्टीन प्रकरणावरून चव्हाणांचा थेट सवाल.
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश.
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा.
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी.
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार.
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं..
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं...