Nashik Accident : बुलडाणा, बीडनंतर आता नाशकात भीषण अपघात! वऱ्हाड्यांनी भरलेला टेम्पो उलटला, 13 जण जखमी

Shahapur Accident : यामधील चार रुग्णांची प्रकृती जास्त खालवल्याने असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी सिव्हिल रुग्णालय ठाणे येथे नेण्यात आले आहे.

Nashik Accident : बुलडाणा, बीडनंतर आता नाशकात भीषण अपघात! वऱ्हाड्यांनी भरलेला टेम्पो उलटला, 13 जण जखमी
नाशिकमध्ये भीषण अपघातImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Apr 23, 2022 | 1:36 PM

नाशिक : बीड, बुलडाण्यानंतर (Beed and Buldana Accident) आणखी एक भीषण अपघात (Nashik Road Accident) झाला. वऱ्हाड्यांनी भरलेला ट्रक उलटला. यात 13 जण जखमी झाले. शहापूर तालुक्यात (Shahapur Taluka) हा अपघात झाला. तानसा (आखाराचा पाडा) येथील नवरी मुलगी आणि त्यांचे वऱ्हाड हे विवाहासाठी बेंदवड येथे प्रवास करत असताना टेम्पो पलटी होऊन भीषण अपघात झाला आहे.या अपघातात 13 महिला, पुरुष व लहान बालकांचा दुखापतग्रस्त झाली आहेत. याघटनेची माहिती मिळताच आमदार पांडुरंग बरोरा यांनी उपजिल्हा रुग्णालय शहापूर येथे भेट दिली. शिवसेनेची शहापूर येथे अद्यावत असलेली रुग्णवाहिका रुग्णांसाठी उपलब्ध करुन दिली. यामधील चार रुग्णांची प्रकृती जास्त खालवल्याने असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी सिव्हिल रुग्णालय ठाणे येथे नेण्यात आले आहे.

24 तासातला तिसरा अपघात..

शनिवार अपघातवार ठरताना दिसतोय. शनिवारी सकाळी बुलडाण्यात भीषण अपघात झाला. त्यानंतर बीडमध्येही भयंकर अपघात झाला होता. गेल्या 24 तासात झालेला ता तिसरा अपघात ठरलाय. त्यामुळे शनिवार घातवार ठरलाय. तीन वेगवेगळ्या अपघातात नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. तर नाशिकमधील एकट्या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नसली तरी एकूण 14 जण जखमी झाले आहेत.

लग्नाचं काय?

भीषण अपघातामुळे लग्न कार्यातही अडथळ निर्माण झालाय. तर लग्न सोहळ्याच्या उत्साहावरही पाणी फेरलंय. दुसरीकडे सकाळी बुलडाण्यात साखरपुड्याला जाण्यासाठी निघालेल्या कारचा आणि ट्रॅव्हल्स बसचा अपघात झाला होता. या अपघातात तिघांचा मृत्यू झाला होता.

तर इकडे बीड जिल्ह्यात अत्यंत भीषण अपघात झाला. ट्रक आणि जीपचा हा अपघात एवढा भीषण होता की, 6 जण जागीच ठार झाले. बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथे भरधाव वेगात असलेल्या ट्रक आणि जीपची समोरासमोर धडक झाली. हा अपघात अंबाजोगाई तालुक्यातील सायगावच्या खडी केंद्राजवळ घडला. दरम्यान, अपघातात मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.