AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महिलेच्या मृत्यूनंतर अडीच तोळ्यांची सोन्याची पोत लंपास, नाशिकच्या रुग्णालयात धक्कादायक प्रकार

नाशिक शहरातील स्पंदन हॉस्पिटलविरोधात सरकारवाडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Nashik Hospital theft Mangalsootra)

महिलेच्या मृत्यूनंतर अडीच तोळ्यांची सोन्याची पोत लंपास, नाशिकच्या रुग्णालयात धक्कादायक प्रकार
नाशिकमधील रुग्णालयावर चोरीचा आरोप
| Updated on: Apr 19, 2021 | 2:47 PM
Share

नाशिक : मृताच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा धक्कादायक प्रकार नाशिकमधील नामांकित रुग्णालयात उघड झाला आहे. मयत महिला रुग्णाच्या गळ्यातील सोन्याची पोत चोरी झाल्याचा आरोप तिच्या मुलाने केला आहे. स्पंदन हॉस्पिटलमध्ये उपचार घेणाऱ्या महिलेचा दागिना मृत्यूनंतर चोरीला गेल्याचा दावा केला जात आहे. हॉस्पिटल प्रशासनाने तपासकामात सहकार्य करण्याची तयारी दर्शवली आहे. (Nashik Spandan Hospital staff allegedly theft Dead lady’s Mangalsootra)

नाशकातील महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू

गौरव शिंदे यांनी नाशिक शहरातील सरकारवाडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शिंदे यांच्या आई कल्याण शिंदे यांची कोरोनामुळे तब्येत खालावली. त्यांना कुटुंबीयांनी राजीव गांधी भवन परिसरातील स्पंदन हॉस्पिटलमध्ये दाखल केले. उपचार सुरु असताना, त्यांचा मृत्यू झाला.

अडीच तोळ्यांची सोन्याची पोत चोरीला

हॉस्पिटलने मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात दिला. मात्र, शिंदे यांच्या गळ्यातील तब्बल अडीच तोळ्यांची सोन्याची पोत चोरीला गेल्याचे उघडकीस आले. ही बाब गौरव शिंदे यांनी हॉस्पिटल प्रशासनाच्या लक्षात आणून दिली. हॉस्पिटल प्रशासनाने उपस्थित कर्मचाऱ्यांकडे चौकशी केली. सीसीटीव्ही तपासले. मात्र, त्यातून चोरी गेलेली पोत सापडत नसल्याने गौरव शिंदे यांनी सरकारवाडा पोलिस ठाणे गाठून फिर्याद दिली.

रुग्णालयाकडून सहकार्याची भूमिका

याबाबत हॉस्पिटलचे संचालक राजेश यादव यांनी सांगितले, की चोरीची घटना घडली असेल तर ती दुर्दैवी आहे. मात्र, त्यातील दोषी सुटणार नाही, याची आम्ही काळजी घेऊ. पोलिसांना सर्व सहकार्य आहे अस हॉस्पिटलकडून सांगण्यात आला आहे. या प्रकरणी नाशिकचा सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आला असून पोलीस या प्रकरणाची कसून चौकशी करत आहेत.

नाशिक शहरामध्ये एकीकडे कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यूचा वाढता आकडा मन हेलावून टाकणारा आणि धडकी भरवणारा असताना या कठीण प्रसंगात देखील मयताच्या टाळू वरचा लोणी खाण्याचा प्रकार काही रुग्णालय करत असल्याने हा अमानवी प्रकार थांबवावा अशी मागणी नाशिककर करत आहेत.

लातुरात सोन्याच्या कर्णफुलांची चोरी

लातूर जिल्ह्यात वृद्धेच्या कर्णफूलांची चोरी झाल्याचा प्रकार गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात घडला होता. अहमदपूर तालुक्यातल्या सावरगाव येथील वृद्ध महिला कोरोना पॉझिटिव्ह आल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होती. यादरम्यान, पीपीई किट घातलेली एक महिला तिच्याजवळ आली आणि तुमचे पती कानातली फुले मागत आहेत, काढून दे, मी त्यांना नेऊन देते, असं सांगून तिने सोन्याची फुलं काढून घेतली.

दुसऱ्या दिवशी त्या महिलेच्या पतीने तिच्याकडे कानातली फुले कुठे गेली, याची विचारणा केली. तेव्हा इथल्या पीपीई किटमधील महिलेने तुमच्याकडेच आणून देण्यासाठी नेली असल्याचं महिलेने सांगितलं. तेव्हा या वृद्ध दाम्पत्याच्या कर्णफुले चोरीला गेल्याचं लक्षात आलं.

संबंधित बातम्या :

लातुरात कोरोना बाधित महिलेची कर्णफुलं रुग्णालयातून चोरीला, कोरोना वॉर्डात तपास कसा करावा?, पोलिसांसमोर प्रश्न

कृत्रिम श्वासावर जगणाऱ्या विवाहितेकडे पाहूनही वासना चाळवली, कोव्हिड सेंटरमध्ये बलात्काराचा प्रयत्न

(Nashik Spandan Hospital staff allegedly theft Dead lady’s Mangalsootra)

मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?.
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!.
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ.
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम.
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन.
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.