AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईसह अमरावतीच्या पोलीस आयुक्तांना नोटीस; खासदार राणांच्या तक्रारीवरून झब्बू, प्रकरण काय?

खासदार नवनीत राणा या मातोश्रीवर जायला निघण्यापूर्वीच पोलिसांनी सायंकाळी त्यांना घरूनच ताब्यात घेऊन पोलीस आयुक्त कार्यालयात आणले होते. यावेळी खासदार नवनीत राणा चांगल्याच संतापल्या होत्या. त्यांनी तेव्हाच सांगितले होते की, या सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांना संसदेत बोलावून यांच्यावर निलंबनाची कारवाई करायला लावणार. याचीच तक्रार खासदार नवनीत राणा यांनी लोकसभा अध्यक्ष यांना केली अन्...

मुंबईसह अमरावतीच्या पोलीस आयुक्तांना नोटीस; खासदार राणांच्या तक्रारीवरून झब्बू, प्रकरण काय?
नवनीत राणा आणि रवी राणा.
| Edited By: | Updated on: Mar 02, 2022 | 9:25 AM
Share

अमरावतीः राज्यभर भाजप (BJP) विरुद्ध शिवसेना असा राजकीय सामना रंगलेला आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडतायत. त्यात भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मुंबई पोलीस आयुक्तांची जाणूनबुजून बदली केल्याचा आरोप केला न केला तोच, खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांच्या तक्रारीवरून अमरावतीसह मुंबईच्या पोलीस (Mumbai Police) आयुक्तांना नोटीस बजावल्याचे समोर आले आहे. त्यात अमरावती पोलीस आयुक्त, मुंबई पोलीस आयुक्त आणि पोलीस उपआयुक्त अमरावती यांना लोकसभा सचिवालयात 9 मार्च रोजी हजर राहण्चे आदेश देण्यात आले आहेत. 15 नोव्हेंबर 2020 रोजी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना पोलिसांनी घेतले होते. यावेळी पोलीस वाहनात खासदारांना बसवून नेले, मुंबईला जात असताना जबरदस्तीने थांबविले तसेच पोलिसांनी अपशब्द वापरल्याचा खासदार नवनीत राणा यांचा आरोप आहे.

कसे झाले प्रकरण सुरू?

अमरावती जिल्ह्यात 2020 मध्ये प्रचंड पावसामुळे शेतीचं खूप नुकसान झाले. त्यामुळे शेतकऱ्यांना 50 हजार रुपये प्रति एकर नुकसान भरपाई आणि 50 टक्के वीजबिल माफ करावे, अशी मागणी आमदार रवी राणा यांनी केली. या मागणीसाठी राणांनी शेतकऱ्यांना घेऊन 13 नोव्हेंबर 2020 ला अमरावती -नागपूर महामार्ग मोझरी येथे तब्बल दोन तास रास्तारोको आंदोलन केले. यावेळी तिवसा येथे टायरची जाळपोळ केली. या आंदोलनाला हिंसक वळण लागले होते.

मातोश्रीवर जाणार होते, पण…

आंदोलनामुळे आमदार रवी राणा यांच्यासह 18 शेतकऱ्यांना तिवसा पोलिसांनी अटक केली आणि न्यायालयाने 20 नोव्हेंबर 2020 पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली होती. यावेळी आमदार रवी राणांनी दिवाळी न्यायालयीन कोठडीत काढली. 14 नोव्हेंबर 2020 रोजी दिवाळीच्या दिवशी खासदार नवनीत राणा यांनी कारागृहाबाहेर महिलांना घेऊन ठिय्या आंदोलन केले. त्यानंतर 15 नोव्हेंबर 2020 रोजी हे दोघेही शेतकऱ्यांना घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटायला मातोश्रीवर जाऊन त्यांना निवेदन देणार होते.

अन् नोटीस निघाली…

नवनीत राणा या मातोश्रीवर जायला निघण्यापूर्वीच पोलिसांनी सायंकाळी त्यांना घरूनच ताब्यात घेऊन पोलीस आयुक्त कार्यालयात आणले होते. यावेळी खासदार नवनीत राणा चांगल्याच संतापल्या होत्या. त्यांनी तेव्हाच सांगितले होते की, या सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांना संसदेत बोलावून यांच्यावर निलंबनाची कारवाई करायला लावणार. याचीच तक्रार खासदार नवनीत राणा यांनी लोकसभा अध्यक्ष यांना 12 जानेवारी 2021 ला केली आणि त्या तक्रारीवर भारती पवार, हिना गावित यांच्यासह इतर चार खासदारांच्या स्वाक्षऱ्या आहेत. या तक्रारीची दखल घेत अखेर लोकसभा सचिवालयमधून 24 फेब्रुवारी 2022 ला उपसचिवांनी 9 मार्च रोजी मुंबई पोलीस आयुक्त, अमरावती पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंग आणि तत्कालीन अमरावती पोलीस उपआयुक्त शशिकांत सातव यांना उपस्थित राहण्याची नोटीस बजावली आहे.

इतर बातम्याः

चर्चा तर होणारच: केंद्रीय मंत्री भागवत कराडांच्या दौऱ्याचे नाशिकमध्ये ‘कुर्रर्रर’ राजकीय नाट्य…!

कापडणीस पिता-पुत्राचा 4 जणांनी केला मर्डर; नाशिकमधील शेअर्स कंपनीच्या मॅनेजरचा सहभाग

चिन्मय, पूजा, सिद्धार्थला सुविचार गौरव पुरस्कार; जयंत पाटलांच्या हस्ते 10 मान्यवरांचा नाशिकमध्ये होणार सन्मान

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.