Navratri 2023 | 11 वर्षाची मुलगी ‘बेस्ट गरबा’ प्राइज जिंकली, पण कुटुंबाने कर्ता पुरुष गमावला, नेमकं काय घडलं?
Navratri 2023 | 11 वर्षाच्या मुलीने 'बेस्ट गरबाच' प्राइज जिंकलं, पण तिचा हा आनंद क्षणिक ठरला. अख्ख्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. माली रात्री 1 च्या सुमारास घरी परतली. नवरा सरमनसोबत ती घराच्या बाहेर बसली होती.
पोरबंदर : नवरात्रीत देवी पूजनाबरोबर गरबा, दांडियाचा उत्साह असतो. विविध ठिकाणी आयोजक गरबा, दांडियाचे विशेष आयोजन करतात. उत्तम गरबा तसच दांडिया खेळणाऱ्यांना बक्षीस दिली जातात. एका 11 वर्षाच्या मुलीने बेस्ट गरबा प्राइज जिंकलं. पण तिचा हा आनंद क्षणिक ठरला. बक्षीस जिंकण्याचा हा उत्साह दु:खामध्ये बदलला. कृपाली ओदिदारा या मुलीला दोन कॅटेगरीमध्ये बक्षिस मिळालं होतं. या मुलीची आई माली तिला आणण्यासाठी कार्यक्रमाच्या स्थळी गेली होती. त्यावेळी कृपालीने तिच्या आईला एकच बक्षीस मिळाल्याच सांगितलं. मालीने गरब्याचे आयोजक राजू केसवाला यांच्याकडे या बद्दल चौकशी केली. केसवाला यांनी खूप वाईट पद्धतीने उत्तर दिलं. कार्यक्रम संपलाय आता काही करु शकत नाही, असं त्यांनी सांगितलं. यावरुन वादावादी सुरु झाली. केसवाला त्यांची पत्नी सहआयोजक आणि माली यांच्यात वादवादी सुरु झाली.
आता इथून निघून गेली नाहीस, तर जीवे मारु अशी धमकीच त्यांनी मालीला दिली. गुजरातच्या पोरबंदर शहरात मंगळवारी ही घटना घडली. माली रात्री 1 च्या सुमारास घरी परतली. नवरा सरमनसोबत ती घराच्या बाहेर बसली होती. रात्री 2.30 च्या सुमारास चार जण बाईकवरुन आले. त्यांनी लाठी-काठीने सरमनला मारहाण सुरु केली. त्यांनी सरमनला उचलून बाईकवर ठेवलं व गरबा आयोजनस्थळी घेऊन गेले. तिथे त्यांनी सरमनला बदेम मारहाण केली. शरीरातून रक्तस्त्राव सुरु होता
मालीने पोलिसांना याची माहिती दिली व ती घटनास्थळी गेली. सरमन जमिनीवर पडलेला होता. शरीरातून रक्तस्त्राव सुरु होता. त्याला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलं. तिथे डॉक्टरांनी तपासल्यानंतर सरमनला मृत घोषित केलं. पोलिसांनी केसवालासह त्याची पत्नी आणि अन्य आरोपींवर हत्या आणि किडनॅपिंगचा गुन्हा नोंदवलाय.