ग्राहकाशी केवळ 30 सेकंदच बातचित, टॅटूच्या नावाखाली ड्रग्ज विक्री, विरारचा तरुण NCB च्या ताब्यात

विरारमध्ये टॅटू काढण्याच्या दुकानात रोहित एमडी, एलएसडी आणि कोकेन यासारखी ड्रग्ज तो आलेल्या ग्राहकांना पुरवत होता. (NCB Drug Peddler Rohit Waghela)

ग्राहकाशी केवळ 30 सेकंदच बातचित, टॅटूच्या नावाखाली ड्रग्ज विक्री, विरारचा तरुण NCB च्या ताब्यात
आरोपी रोहित वाघेला विरारमधून ताब्यात
Follow us
| Updated on: Apr 15, 2021 | 2:53 PM

मुंबई : टॅटू काढण्याच्या नावाखाली अंमली पदार्थांचा व्यवसाय करणारा ड्रग्ज पेडलर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या (NCB) हाती लागला आहे. आरोपी रोहित वाघेला आपल्या ग्राहकांशी फक्त 30 सेकंदच बोलत असे. विरारमध्ये आपल्याच दुकानात ड्रग्जचा व्यवसाय रोहित करत होता. आरोपी रोहित वाघेला आपल्य्या घरात रेव्ह पार्टीचं आयोजनही करत असल्याची माहिती मिळाली आहे. (NCB detain Drug Peddler Rohit Waghela from Virar who sells drug in Tattoo Shop)

विरारमध्ये टॅटू काढण्याच्या दुकानात रोहित एमडी, एलएसडी आणि कोकेन यासारखी ड्रग्ज तो आलेल्या ग्राहकांना पुरवत होता. रोहित आपल्या ग्राहकांसोबत ड्रग्सच्या कोड वर्डमध्ये बोलत असे. आपल्या ग्राहकांशीही तो फक्त 30 सेकंदच बोलायचा, जेणेकरुन कोणीही त्याला शोधू शकणार नाही. या प्रकरणी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोची टीम अधिक तपास करत आहे.

सुशांतसिंग संबंधी ड्रग्ज प्रकरणाचे धागे दुबईपर्यंत

दुसरीकडे, बहुचर्चित सुशांत सिंग राजपूतशी संबंधित ड्रग्ज प्रकरणाचं (Sushant Singh Rajput Drugs Case) दुबई कनेक्शन उघडकीस आलं आहे. जवळपास 6 ते 7 महिन्यांच्या अथक प्रयत्नांनंतर मुख्य संशयित आरोपीची नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने ओळख पटवली आहे. हा आरोपी साहिल शाह ऊर्फ फ्लाको (Sahil Shah alias Flacko) दुबईत लपून बसला आहे. धक्कादायक म्हणजे अटकेतील दोन ड्रग्ज पेडलरपैकी एक जण DYSP म्हणजे पोलिस उपअधीक्षक होण्यासाठी तयारी करत होता.

कोण आहे साहिल शाह?

साहिल शाह उर्फ फ्लाको हा मालाडच्या इंटरफेस हाईट्स इमारतीमधला रहिवासी आहे. याच इमारतीत सुशांत सिंग राजपूत पूर्वी राहत होता. साहिल शाह गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून त्याच्यावर आतापर्यंत मारामारी, धमकावणे अशा अनेक केसेस आहेत. मात्र तो दुबईला पळून गेल्याची माहिती असून तिथूनच आपला ड्रग्जचा कारभार संचालित करत असल्याचं समजतं. (NCB Drug Peddler Rohit Waghela)

काय होती साहिलची मोडस ऑपरेंडी?

साहिल शाह उर्फ फ्लाको या आरोपीबाबत म्हटलं जातं की तो कुठे आहे, हे कोणालाच माहिती नाही. त्याच्या कुठल्याही ड्रग पेडलरने त्याला आजतागायत पाहिलेले नाही. ड्रग्जची ऑर्डर मिळाल्यानंतर तो एके ठिकाणी ड्रग्जची पॅकेट्स जमा करतो. नंतर त्याच्या पेडलर्सला ती कलेक्ट करायला सांगतो. जेव्हा एका पेडलरकडे कोणी ग्राहक येतो, तेव्हा तो पेडलरला आधी व्हिडीओ कॅमरा सुरु करायला सांगत असे. 360 डिग्री म्हणजे चहूबाजूना व्हिडीओ कॅमेराने बघून जेव्हा सर्वकाही आलबेल असल्याची खात्री त्याला पटते, तेव्हा तो कस्टमरला ड्रग्ज द्यायला सांगत होता. अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे साहिल पेडलर आणि ग्राहकाला बघत असे, मात्र स्वतःचा कॅमेरा तो कायम बंद ठेवायचा, जेणेकरुन त्याला कोणीही बघू नये.

संबंधित बातम्या 

सुशांतसिंग संबंधी ड्रग्ज प्रकरणाचे धागे दुबईपर्यंत, पण सूत्रधार साहिल शाहाचा चेहराच पेडलर्सना माहिती नाही

सुशांतसिंग संबंधी ड्रग्ज प्रकरण, अटकेतील ड्रग पेडलरची पोलिस उपअधीक्षक होण्यासाठी तयारी

(NCB detain Drug Peddler Rohit Waghela from Virar who sells drug in Tattoo Shop)

भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....