80 रुग्णांच्या मृत्यूला डॉ. महेश दुधनकर जबाबदार, सांगलीत आणखी एका डॉक्टरवर आरोप, राष्ट्रवादीचे नेते आक्रमक

सांगली जिल्ह्यात कोरोनाच्या काळात डॉक्टरांनी रुग्णांच्या नातेवाईकांकडून भरमसाठ पैसे उकळल्याचा आरोप केला जात आहे. सांगली मिरज रोडवरील अपेक्स हॉस्पिटलमधील रुग्णांच्या मृत्यूचे प्रकरण गाजत असताना आता डॉ. महेश जाधवनंतर डॉ. महेश दुधनकर यांच्यावरही आरोप करण्यात आला आहे.

80 रुग्णांच्या मृत्यूला डॉ. महेश दुधनकर जबाबदार, सांगलीत आणखी एका डॉक्टरवर आरोप, राष्ट्रवादीचे नेते आक्रमक
डॉ. महेश दुधनकर
Follow us
| Updated on: Jul 06, 2021 | 8:17 AM

सांगली : सांगली शहरातील डॉ. महेश दुधनकर (Dr Mahesh Dudhankar) यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक युवराज गायकवाड (Yuvraj Gaikwad) यांनी केली आहे. कोरोना उपाचाराच्या नावाखाली दुधनकर हॉस्पिटलमध्ये झालेल्या 80 रुग्णांच्या मृत्यूला डॉक्टर दुधनकर कारणीभूत असल्याचा आरोप गायकवाडांनी केला आहे. दुधनकर हॉस्पिटल आणि डॉक्टरांवर कारवाई करावी, अन्यथा 12 जुलै रोजी महापालिकेसमोर आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला. (NCP demands action against Sangli Doctor Dr Mahesh Dudhankar for Corona Patients Deaths)

सांगली जिल्ह्यात कोरोनाच्या काळात डॉक्टरांनी रुग्णांच्या नातेवाईकांकडून भरमसाठ पैसे उकळल्याचा आरोप केला जात आहे. सांगली मिरज रोडवरील अपेक्स हॉस्पिटलमधील रुग्णांच्या मृत्यूचे प्रकरण गाजत असताना आता डॉ. महेश जाधवनंतर डॉ. महेश दुधनकर यांच्यावरही आरोप करण्यात आला आहे.

काय आहे आरोप?

सांगलीच्या लव्हली सर्कलला दुधनकर यांचा कोव्हिड दवाखाना आहे. त्यांनी कोरोनाग्रस्त रुग्णांच्या नातेवाईकांकडून भरमसाठ बिलं आकारल्याचा आरोप आहे. तसेच मृत्यूचे प्रमाणही मोठ्या संख्येने असल्याचं बोललं जात. दुधनकरांना महापालिकेने परवाना कसा दिला, या प्रकरणी चौकशी झाली पाहिजे. जर या डॉक्टरांना आयुक्त आणि आरोग्य अधिकारी पाठिशी घालत असतील, तर त्यांच्यावरही मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी माजी नगरसेवक युवराज गायकवाड यांनी केली आहे.

डॉ. दुधनकरांचा दावा काय?

दरम्यान, शासनाने दिलेल्या आदेशनुसार मी कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार केले आहेत. माझ्याकडे एकूण 276 रुग्ण अॅडमिट होते त्यापैकी 70 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला, तर 207 जण कोरोनामुक्त होऊन बरे झाले आहेत. मी कोणाकडून जास्त पैसे घेतलेले नाहीत, अशी माहिती दुधनकार हॉस्पिटलचे डॉ महेश दुधनकर यांनी टीव्ही9 मराठीशी बोलताना दिली

संबंधित बातम्या :

मिरजेच्या रुग्णालयात 87 रुग्णांचा मृत्यू प्रकरण, डॉ. महेश जाधवच्या डॉक्टर भावालाही अटक

मिरजेच्या रुग्णालयात 87 रुग्णांचा मृत्यू, तिघा अॅम्ब्युलन्स चालकांना अटक, आरोपींचा आकडा 13 वर

(NCP demands action against Sangli Doctor Dr Mahesh Dudhankar for Corona Patients Deaths)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.