खोकल्याच्या औषधी बाटल्यांचा मोठा साठा भिवंडीतून जप्त! 8,640 खोकल्याच्या औषधी बाटल्यांवर NCBची कारवाई

Bhiwandi NCB Raid News : जवळपास 864 किलो कोडीनयुक्त औषधांचा साठा जप्त करण्यात आला आहे.

खोकल्याच्या औषधी बाटल्यांचा मोठा साठा भिवंडीतून जप्त! 8,640 खोकल्याच्या औषधी बाटल्यांवर NCBची कारवाई
मोठी कारवाईImage Credit source: instagram
Follow us
| Updated on: May 22, 2022 | 10:36 AM

मुंबई : खोकल्याच्या (Cough Syrup) औषधांच्या आडून नशेखोरांना बाटल्या पुरवल्या जात असल्याप्रकरणी एनसीबीनं मोठी कारवाई केली. भिवंडीतून (Bhiwandi crime News) याप्रकरणी मोठा साठा एनसीबीनं जप्त केला आहे. खोकल्याच्या औषधी बाटल्यांचा साठा एनसीबीननं हस्तगत केलाय. तब्बल 8 हजार 640 खोकल्याच्या बाटल्या एनसीबीनं (NCB Raid) जप्त केल्या आहेत. तसंच एक बोलेरो कार आणि एक दुचाकीदेखील जप्त केली आहे. जवळपास 864 किलो कोडीनयुक्त औषधांचा साठा जप्त करण्यात आला आहे. या औषधांचा वापर नशा करण्यासाठी केला जात असल्याची माहिती एनसीबीला मिळाली होती. त्यानंतर सापळा रचून एनसीबीनं ही कारवाई केली आहे. डॉक्टरांच्या प्रीस्क्रिप्शनशिवाय या बाटल्या विकली जाणार असल्याचा संशय एनसीबीला होता. त्यानंतर एनसीबीनं मोठी कारवाई करत भिवंडीतून या खोकल्याच्या औषधांच्या बाटल्यावर जप्तीची कारवाई केली आहे.

रंगेहाथ पकडलं!

द विकने दिलेल्या रिपोर्टनुसार, शनिवारी ठाण्याजवळील भिवंडी शहराजवळ एनसीबीनं ही कारवाई केली. यावेळी भिवंडी शहराजवळ आग्रा-मुंबई महामार्गावर एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचला होता. एका संशयास्पद गाडीला थांबवून या कारची झाडाझडती केली.

पुण्यातली मोठी बातमी : वसंत मोरेंची खदखद समोर : पाहा व्हिडीओ

हे सुद्धा वाचा

झाडाझडती केल्यानंतर कारमध्ये संशयास्पद रीत्या औषधांच्या बाटल्यांची वाहतूक केली जात असल्याचं समोर आलं. यावेळी 8 हजार 640 खोकल्याच्या बाटल्यांचा साठा 60 बॉक्समध्ये ठेवलेला होता. हा साठा लगेचच एनसीबीनं ताब्यात घेतला. नशेसाठी आणि गैरहेतूनं या औषधी बाटल्यांची विक्री केली जात असल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली.

सिनेस्टाईल पाठलाग

कार चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर एका दुचाकी चालकाबाबत एनसीबीला माहिती मिळाली. सिनेस्टाईल या दुचाकीस्वाराचा पाठलाग करुन एनसीबीच्या पथकानं आणखी एकाला अटक केली आहे. एकूण दोन वाहनं या कारवाईत जप्त करण्यात आली असून आता याप्रकरणी अधिक तपास केला जातो आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.