Sachin Vaze: कार संपल्या, वाझे प्रकरणात आता स्पोर्टस बाईकची एन्ट्री; ‘ती’ दुचाकी NIAच्या ताब्यात

आज सकाळी टेम्पोमधून ही मोटार एनआयएच्या कार्यालयात आणण्यात आली. | Sachin Vaze Sports bike

Sachin Vaze: कार संपल्या, वाझे प्रकरणात आता स्पोर्टस बाईकची एन्ट्री; 'ती' दुचाकी NIAच्या ताब्यात
Follow us
| Updated on: Apr 05, 2021 | 1:11 PM

मुंबई: अंबानी स्फोटक प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून (NIA) सचिन वाझे यांच्या सुरु असलेल्या चौकशीत आणखी चक्रावणारी माहिती समोर आली आहे. आतापर्यंत याप्रकरणात अनेक कारचा सहभाग असल्याचे उघड झाले होते. त्यानंतर आता याप्रकरणात स्पोर्टस बाईकची एन्ट्री झाली आहे. (New sports bike found by NIA in Sachin Vaze Case)

ही स्पोर्टस बाईक मीना जॉर्ज यांच्या नावावर आहे. दमणमधून ही बाईक एनआयएने जप्त केली. ही स्पोर्टस बाईक बेनेली कंपनीची आहे. या स्पोर्टस बाईकची किंमत जवळपास 7 लाख 16 लाख इतकी आहे. काही दिवसांपूर्वी एनआयएने मीना जॉर्ज यांना ताब्यात घेतले होते. ट्रायडंट हॉटेलच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये मीना जॉर्ज सचिन वाझे यांच्यासोबत दिसून आल्याचे सांगितले जाते. त्यावेळी त्यांच्या हातात पैसे मोजण्याचे मशीन होते, असेही सांगितले जाते.

आज सकाळी टेम्पोमधून ही मोटार एनआयएच्या कार्यालयात आणण्यात आली. या प्रकरणात आतापर्यंत आठ चार चाकी वाहने आणि एक दुचाकी वाहन जप्त करण्यात आली आहे. NIA च्या पथकांनी आतापर्यंत एकूण नऊ वाहने जप्त केली आहे. या वाहनांचा उपयोग वाझे किंवा वाझेंच्या सहकाऱ्यांकडून करण्यात आल्याचा ‘एनआयए’चा संशय आहे.

मिठी नदीतून डीव्हीआर आणि कॉम्प्युटर जप्त

काही दिवसांपूर्वीच सचिन वाझे यांनी आपण सीसीटीव्ही फुटेजचा डीव्हीआर आणि कॉम्प्युटर मिठी नदीत टाकल्याची कबुली दिली होती. त्यानंतर एनआयएच्या अधिकाऱ्यांना सचिन वाझे यांना घटनास्थळी नेऊन या सर्व गोष्टी मिठी नदीतून मेटल डिटेक्टरच्या साहाय्याने शोधून काढल्या होत्या. आता या सर्व गोष्टींची तपासणी सुरु आहे. ( NIA detained woman from Mira Road)

मुकेश अंबानींच्या घराजवळ मिळालेली स्फोटकांनी भरलेली कार आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणी NIA च्या हाती बुधवारी आणखी एक आलिशान गाडी लागली. सचिन वाझे वापरत असलेल्या ऑडी कारचा तपास NIA कडून गेल्या काही दिवसांपासून सुरु होता. NIA ने वसई परिसरातून MH 04 FZ 6561 नंबरची ऑडी ताब्यात घेतली.

संबंधित बातम्या:

ना वाझेंशी भेट, ना अँटिलिया स्फोटक कटात सहभाग, यूपीच्या बड्या गँगस्टरने आरोप फेटाळले

मिठी नदी 18 किमी लांब, तिथेच वस्तू कशा सापडल्या, वाझे-NIA चं कोर्टात घमासान, 26 लाखांपैकी 5 हजारच खात्यात शिल्लक

सचिन वाझे केस : मीना जॉर्जच्या नावे मीरा रोडमध्ये फ्लॅट भाड्याने, 13 तासांच्या तपासानंतर NIA महिलेसह मुंबईला रवाना

(New sports bike found by NIA in Sachin Vaze Case)

Non Stop LIVE Update
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.