धुमधडाक्यात लग्न, घरात आनंदाचं वातावरण होतं, अचानक लाईट गेली अन्…

मुलाचे लग्न झाल्याने घरी उत्साहाचे वातावरण होते. विवाहानंतरच्या विधी सुरु होत्या. घरात पाहुणे मंडळी जमली होती. इतक्यात लाईट गेली अन् पुढे घातच झाला.

धुमधडाक्यात लग्न, घरात आनंदाचं वातावरण होतं, अचानक लाईट गेली अन्...
तरुणीची फसवणूक करणाऱ्या तरुणाला भरमांडवातून पोलिसांनी ताब्यात घेतले
Follow us
| Updated on: May 15, 2023 | 5:21 PM

मैनपुरी : उत्तर प्रदेशात एक काळीज पिळवटून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. जिल्ह्यातील नागला कंस गावात वीजेचा शॉक लागल्याने नवविवाहित तरुणाचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे दोन दिवसांपूर्वी तरुणाचे लग्न झाले होते. नवरा-नवरीच्या अंगावरील हळद उतरली नव्हती, अन् लग्नघरात शोकाकुल वातावरण पसरले आहे. पतीच्या निधनामुळे नववधूवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. सोनू सिंग असे मयत तरुणाचे नाव असून, तो बीएचा विद्यार्थी होता. मयत सोनू आणि आरती यांचा 11 मे रोजी मोठ्या थाटामाटात विवाह झाला होता. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

11 मे रोजी थाटामाटात विवाह पार पडला

मैनपुरीच्या नागला कंस गावातील सोनू सिंग याचा नागला सडा गावातील आरतीसोबत 11 मे रोजी थाटामाटात विवाह सोहळा पार पडला. सोनू सासरकडच्या मंडळींचा निरोप घेत नववधूला घरी घेऊन आला. नववधूचे उत्साहात घरी स्वागत झाले. घरी पै-पाहुणे जमले होते. विवाहानंतरचे रीतिरिवाज सुरु होते. यामुळे घरामध्ये अगदी उत्साहाचे वातावरण होते.

वीजेचा धक्का लागल्याने मृत्यू

अचानक घरातील वीज गेली. सध्या उकाड्याचे दिवस असल्याने सर्व पाहुणे गरमीने हैराण झाले होते. यामुळे सोनू इन्व्हर्टरची तार लावायला गेला. यावेळी त्याला वीजेचा जोरदार झटका बसला आणि तो बेशुद्धावस्थेत जमिनीवर कोसळला. नातेवाईकांनी त्याला तात्काळ रुग्णालयात नेला, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

हे सुद्धा वाचा

कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर

सोनूच्या मृत्यूची बातमी समजताच कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. वधूच्या हातावरील मेंदी पुसण्याआधीच ती विधवा झाली. शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. तरुणावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. सोनूच्या मृत्यूमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.