महिनाभरापूर्वीच लग्न झालं होतं, चुलत भावाच्या हळदीला आलेल्या नातेवईकांना सोडायला अन्…

बोईसर रोडवर कारच्या भीषण अपघातात नवविवाहित तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना आज पहाटे घडली. तर कार चालक गंभीर जखमी असून, त्याच्यावर उपचार सुरु आहेत.

महिनाभरापूर्वीच लग्न झालं होतं, चुलत भावाच्या हळदीला आलेल्या नातेवईकांना सोडायला अन्...
पालघरमध्ये कार अपघातात तरुणाचा मृत्यूImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Mar 10, 2023 | 11:50 AM

पालघर / मोहम्मद हुसैन : भरधाव कारचे टायर फुटल्याने पालघर बोईसर रोडवर कारचा भीषण अपघात झाल्याची घटना पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातात कारमधील 23 वर्षीय नवविवाहित तरुणाचा जागीच मृत्यू झाला. कैफ इस्रार खान असं अपघातात मृत्यू झालेल्या 23 वर्षीय तरुणाचं नाव आहे. अपघातात कारचा चक्काचूर झाला. यात कारचालक गंभीर जखमी झाला असून, त्याला उपचारासाठी पालघरमधील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. पालघर बोईसर रोडवर उमरोळी गावात ही घटना घडली.

हळदीला आलेल्या नातेवाईकांना सोडायला गेला होता

मयत तरुणाचे महिनाभरापूर्वीच लग्न झाले होते. काल त्याच्या घरी चुलत भाऊ अल्तमस जुनेद खान याच्या हळदीचा कार्यक्रम होता. हळदीचा कार्यक्रम झाल्यानंतर नातेवाईकांना घरी सोडण्यासाठी पालघर येथे कारने गेला होता. नातेवाईकांना सोडून बोईसर येथे घरी परतत असताना उमरोळी गावाजवळ कारचे टायर फुटले. कार एका मोठ्या झाडावर आदळली.

अपघातात तरुणाचा मृत्यू, कारचालक जखमी

अपघातात कारमधील तरुणासह चालकही गंभीर जखमी झाला. दोघांनाही उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र काही वेळातच कैफचा मृत्यू झाला. तर जखमी कार चालकावर सध्या पालघरमधील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृत कैफचं महिनाभरापूर्वीच लग्न झालं होतं. कैफच्या मृत्यूने सध्या परिसरात शोकाकुल वातावरण असून, कुटुंबातच लग्न असताना कैफच्या झालेल्या मृत्यूने हळहळ व्यक्त होत आहे.

हे सुद्धा वाचा

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.