Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबई पोलिसातील ‘त्या’ बड्या अधिकाऱ्याच्या चौकशीसाठी NIAची तयारी; दिल्लीतील तीन वरिष्ठ अधिकारी मुंबईत दाखल

हा अधिकारी अत्यंत मोठ्या पदावर असल्यामुळे विक्रम खलाटे यांच्यावर चौकशी करताना दडपण येऊ शकते. | NIA Sachin Vaze Mumba police

मुंबई पोलिसातील 'त्या' बड्या अधिकाऱ्याच्या चौकशीसाठी NIAची तयारी; दिल्लीतील तीन वरिष्ठ अधिकारी मुंबईत दाखल
या तपासाची सूत्रे हाती घेतल्यापासून काही तासांतच NIA च्या कारवाईला वेग आला आहे. आतापर्यंत केवळ मनसुख हिरेन प्रकरणात संशयित असलेले पोलीस अधिकारी सचिन वाझे यांचा अंबानींच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी ठेवण्यातही सहभाग असल्याची माहिती पुढे आली होती.
Follow us
| Updated on: Mar 15, 2021 | 12:55 PM

मुंबई: अंबानी स्फोटक प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून (NIA) सुरु असलेल्या चौकशीत API सचिन वाझे (Sachin Vaze) यांनी मुंबई पोलीस दलातील बड्या अधिकाऱ्याचा सहभाग असल्याची कबुली दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या पार्श्वभूमीवर आता NIA ने या बड्या अधिकाऱ्याच्या चौकशीची तयारी सुरु केली आहे. त्यासाठी एनआयएच्या गोटात वेगवान हालचाली सुरु झाल्या आहेत. (NIA found solid evidence in Ambani threat case against Sachin Vaze)

सूत्रांच्या माहितीनुसार, NIA चे तीन वरिष्ठ अधिकारी सोमवारी दिल्लीहून मुंबईत दाखल झाले आहेत. हे अधिकारी पोलीस उपमहानिरीक्षक (DIG) दर्जाचे असल्याची माहिती मिळत आहे. सध्या एनआयएचे अधिकारी विक्रम खलाटे यांच्या नेतृत्त्वाखाली संपूर्ण तपास सुरु आहे. सचिन वाझे यांच्या अटकेनंतर अनेक महत्त्वाचे पुरावे समोर आले आहेत. चौकशीदरम्यान सचिन वाझे यांनी मुंबई पोलीस दलातील एका बड्या पोलीस अधिकाऱ्याचे नाव घेतल्याची चर्चा आहे. त्यामुळे आता NIA या अधिकाऱ्याला चौकशीसाठी पाचारण करण्याची शक्यता आहे. हा अधिकारी अत्यंत मोठ्या पदावर असल्यामुळे विक्रम खलाटे यांच्यावर चौकशी करताना दडपण येऊ शकते. त्यामुळे NIA कडून आणखी तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांना मुंबईत पाठवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

कोण आहेत विक्रम खलाटे?

सचिन वाझे यांना अटक करण्यात आल्यानंतर अधिकारी विक्रम खलाटे रविवारी सकाळी मुंबईतील NIA च्या कार्यालयात पोहोचले. विक्रम खलाटे हे 2008-09 च्या बॅचचे IPS अधिकारी आहेत. बारामती तालुक्यातील लाटे हे त्यांचं मूळ गाव आहे. गेल्या 13 वर्षांपासून ते पोलीस सेवेत कार्यरत असून त्यांना आतापर्यंत केंद्रीय गृह मंत्रालयाकडून दोनवेळा गौरवण्यात आले आहे. सध्या ते एनआयएचे प्रमुख म्हणून काम पाहत आहेत.

NIA च्या तपासाला मोठं यश, दोन्ही गाड्यांच्या चालकांची ओळख पटली

राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (NIA) वेगवान तपासामुळे गेल्या काही तासांत अंबानी स्फोटक प्रकरणात महत्त्वाचे पुरावे समोर आले आहेत. सूत्रांनी दिलेल्या ताज्या माहितीनुसार NIA ने या कटात सहभागी असलेल्या स्कॉर्पिओ आणि इनोव्हा या दोन्ही गाड्यांच्या चालकांची ओळख पटवली आहे. याप्रकरणातील संशयित सचिन वाझे (Sachin Vaze) यांनीच ही माहिती ‘एनआयए’ला दिल्याचे समजते.

त्यामुळे आता ‘एनआयए’च्या हाती आणखी महत्त्वाची माहिती लागणार आहे. NIA लवकरच या दोन्ही चालकांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करेल. अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी उभी करण्यात या दोन्ही वाहनचालकांचा महत्त्वाचा सहभाग होता. त्यामुळे आता याप्रकरणातील आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

संबंधित बातम्या:

मोठी बातमी: NIA चे अधिकारी सचिन वाझेंना पीपीई किट घालून चालायला लावणार

VIDEO: वाझेंचा पाय आणखी खोलात, त्या इनोव्हाचं CCTV फुटेज NIA च्या हाती, बघा 24 फेब्रुवारीला इनोव्हा कुठून बाहेर पडतेय?

स्कॉर्पिओ गाडीवर सचिन वाझेंच्या हाताचे ठसे; NIA ने पुरावे दाखवल्यानंतर वाझेंची बोलती बंद

(NIA found solid evidence in Ambani threat case against Sachin Vaze)

कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा
कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा.
केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं
बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं.
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.
भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली.
'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल
'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल.
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना.
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया.