AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सचिन वाझेंच्या घराला टाळं; कुटुंबीयही 10-12 दिवसांपासून गायब, NIA घराची झडती घेणार?

सचिन वाझे हे ठाण्याच्या साकेत कॉम्प्लेक्स परिसरात बी 6 क्रमांकाच्या इमारतीत वास्तव्याला आहेत. | Sachin Waze NIA

सचिन वाझेंच्या घराला टाळं; कुटुंबीयही 10-12 दिवसांपासून गायब, NIA घराची झडती घेणार?
सचिन वाझे
| Updated on: Mar 14, 2021 | 10:54 AM
Share

ठाणे: मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी ठेवल्याप्रकरणी एनआयएने अटक केलेले मुंबई पोलिसांचे एपीआय सचिन वाझे (Sachin Waze) यांचे कुटुंबीय मागील 10 ते 12 दिवसांपासून घरी नसल्याची बाब समोर आली आहे. वाझे राहत असलेल्या ठाण्यातील साकेत सोसायटीच्या सुरक्षारक्षकाने ही माहिती ‘टीव्ही 9’ ला दिली आहे. (NIA arrested API Sachin Waze in Mukesh Ambani explosive car case)

सचिन वाझे हे ठाण्याच्या साकेत कॉम्प्लेक्स परिसरात बी 6 क्रमांकाच्या इमारतीत वास्तव्याला आहेत. मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी सापडल्यापासून सचिन वाझे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. याच प्रकरणात शनिवारी रात्री त्यांना अटक झाली असून यानंतर ‘एनआयए’कडून वाझे यांच्या घराची झडती घेतली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे टीव्ही 9 त्यांच्या साकेत कॉम्प्लेक्स या घराच्या परिसरात पोहोचली असता वाझे यांचे कुटुंबीय मागील 10 ते 12 दिवसांपासून घरी नसल्याचं सिक्युरिटीने सांगितलं. तसंच त्यांच्या घराला कुलूप आहे, अशी माहिती दिली.

जे.जे. रुग्णालयात सचिन वाझेंची वैद्यकीय तपासणी

राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) सचिन वाझे यांना अटक केल्यानंतर त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. शनिवारी रात्री 3 वाजता वाझे यांना मुंबईच्या जे.जे. रुग्णालयात तपासणीसाठी नेण्यात आले होते. त्यानंतर वाझे यांना पुन्हा एनआयएच्या कार्यालयात आणण्यात आले. आता सकाळी 11 वाजता सचिन वाझे यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे. त्यावेळी एनआयएकडून त्यांच्या पोलीस कोठडीची मागणी केली जाईल.

सचिन वाझेंच्या चौकशीवेळी NIAच्या हाती सबळ पुरावा?

राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे (Sachin Waze) यांना अटक केल्यानंतर आता याप्रकरणाच्या तपासाला वेग आला आहे. NIA ने शनिवारी सचिन वाझे यांनी तब्बल 13 तास कसून चौकशी केली होती. या चौकशीत NIAच्या हाती काहीतरी सबळ पुरावा लागल्याचे सूत्रांकडून सांगितले जात आहे.

याप्रकरणी आता ठाण्यातील एका राजकीय नेत्याची चौकशी होण्याची शक्यताही वर्तविली जात आहे. यापूर्वी भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी सचिन वाझे आणि एका राजकीय नेत्याचे संबंध असल्याचा आरोप केला होता. NIAच्या चौकशीतही नेमकी हीच माहिती पुढे आल्याचे सांगितले जात आहे. ठाण्यातील हा नेता आणि सचिन वाझे यांचे आर्थिक संबंध होते. त्यामुळे आता याप्रकरणात आणखी काही नावे समोर येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

संबंधित बातम्या:

सचिन वाझेंनीच अंबानींच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी प्लॉट केली; NIA चा आरोप

पोलीस फडणवीसांना गुप्त माहिती पुरवतात, हे सरकारसाठी शुभसंकेत नाहीत; संजय राऊतांचा ठाकरे सरकारला इशारा

(NIA arrested API Sachin Waze in Mukesh Ambani explosive car case)

त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान
त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान.
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या...
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या....
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप.
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश.
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!.
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा.
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप.
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले.
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!.
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.