शनिवारी धाडसत्र, सोमवारी चौकशी… NIAची कारवाई सुरूच, आयसीस महाराष्ट्र मॉड्युल प्रकरणी मुंबई कार्यालयात चौकशी

पुणे, मुंबई, ठाणे ग्रामीण यासह अनेक भागात छापे मारत एनआयएच्या अधिकाऱ्यांनी जवळपास 15 जणांना अटक केली. या धाडसत्रादरम्यान एनआयए अधिकाऱ्यांनी भिवंडीच्या पडघ्याजवळील बोरिवली गावातील वीस ते तीस जणांना समन्स बजावले होते.

शनिवारी धाडसत्र, सोमवारी चौकशी... NIAची कारवाई सुरूच, आयसीस महाराष्ट्र मॉड्युल प्रकरणी मुंबई कार्यालयात चौकशी
Follow us
| Updated on: Dec 11, 2023 | 1:50 PM

कृष्णा सोनारवाडकर, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई | 11 डिसेंबर 2023 : शनिवारी सकाळी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) मोठी कारवाई करत महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये तब्बल 41 ठिकाणी छापे मारले. पुणे, मुंबई, ठाणे ग्रामीण यासह अनेक भागात छापे मारत एनआयएच्या अधिकाऱ्यांनी जवळपास 15 जणांना अटक केली. या धाडसत्रादरम्यान एनआयए अधिकाऱ्यांनी भिवंडीच्या पडघ्याजवळील बोरिवली गावातील वीस ते तीस जणांना समन्स बजावले होते. सोमवारी म्हणजे आज चौकशीसाठी येण्याचे हे समन्स होते. त्याप्रमाणे आज एनआयएच्या मुंबई येथील कार्यालयात हे सर्वजण आले असून त्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे.

एकाचवेळी अनेक ठिकाणी छापेमारी, शस्त्रास्त्रे आणि रोकडी जप्त

एनआयए, एटीएस अधिकारी आणि स्थानिक पोलिसांनी मिळून शनिवारी पहाटेपासूनच हे धाडसत्र सुरू केले. ISIS या दहशतवादी संघटनेच्या विरोधात अनेक ठिकाणी छापे टाकण्यात आले. राष्ट्रीय तपास संस्थेला अटक केलेल्या अतिरेक्यांच्या चौकशीतून महत्वाची माहिती मिळाली. त्यानंतर इसिसचे देशभरातील नेटवर्क उद्ध्वस्त करण्यासाठी एकाच वेळी छापेमारी करण्यात आली. महाराष्ट्रासह कर्नाटकमध्येही अनेक ठिकाणी छापे मारण्यात आले. ठाणे ग्रामीणमध्ये भिवंडीतील पडघा येथे कारवाई करण्यात आली.

हे सुद्धा वाचा

त्याच गावातील 20-30 जणांना चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले होते. दरम्यान या धाडस्त्राच अनेक शस्त्रास्ते आणि मोठी रोख रक्कमही जप्त करण्यात आली. एवढेच नव्हे तर यावेळी दहशतवादी संघटना हमासचे झेंडे देखील मिळाल्याचा दावा एनआयएच्या अधिकाऱ्यांनी केला.

15 जणांना अटक

या छाप्यांदरम्यान एनआयने 15 जणांना अटक केली. त्यामध्ये 2002-2003 साली मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटातील आरोपी साकिब नाचण याच्यासह त्याचा मुलगा शामिल आणि भाऊ आकिब यांचाही समावेश आहे. साकिब नाचण हा 2002 आणि 2003 मधील मुंबई बॉम्बस्फोट हल्ल्यातील आरोपी आहे. त्याला दहा वर्षे शिक्षा झाली होती. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर तो पुन्हा सक्रीय झाल्याची माहिती एनआयएला मिळाली होती.

सहा डिसेंबरला इझ्राईल विरोधात जी रॅली निघाली त्यामध्ये यापैकी बहुतेक जण सहभागी असल्याची माहिती देखील समोर आली आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.