VIDEO | प्रेमी युगुलाचा रस्त्यात राडा, भांडण सोडवणाऱ्यालाच प्रेयसीची शिवीगाळ, मग भावाची सटकली आणि…

व्हिडीओमध्ये एक तरुणी तिच्या प्रियकराला बोलबच्चन देता देता शारीरिक चोपही देताना दिसत आहे. मध्येच ती त्याच्यावर दगडफेक करताना पाहायला मिळतं. घटनास्थळी जमलेल्या प्रेक्षकांनी आपल्या मोबाईलमध्ये हा प्रकार रेकॉर्ड करण्यास सुरुवात केली

VIDEO | प्रेमी युगुलाचा रस्त्यात राडा, भांडण सोडवणाऱ्यालाच प्रेयसीची शिवीगाळ, मग भावाची सटकली आणि...
ओदिशामध्ये राडाImage Credit source: टीव्ही9
Follow us
| Updated on: Apr 01, 2022 | 2:00 PM

भुवनेश्वर : प्रेमी युगुलांमध्ये (Couples) भर रस्त्यात होणारी भांडणं अनेकांसाठी मनोरंजनाचा विषय असतो. मात्र शाब्दिक वादावादी तुंबळ हाणामारीत रुपांतरित झाली, तर रस्त्यावरचे बघे हस्तक्षेप करतात. गर्लफ्रेण्ड-बॉयफ्रेण्डमध्ये सुरु असलेल्या वादावादीत एका फूड डिलिव्हरी एक्झिक्युटिव्हने (Food Delivery Executive) मध्यस्थी केली, मात्र प्रेयसी या मध्यस्थी करणाऱ्या तरुणालाच शिवीगाळ करु लागल्याने त्याचाही पारा चढला आणि त्याने या तरुणीलाच चोप दिला. ओदिशातील भुवनेश्वरमध्ये (Bhubaneshwar) मंगळवारी हा प्रकार घडल्याचं समोर आलं आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

नेमकं काय घडलं?

व्हिडीओमध्ये एक तरुणी तिच्या प्रियकराला बोलबच्चन देता देता शारीरिक चोपही देताना दिसत आहे. मध्येच ती त्याच्यावर दगडफेक करताना पाहायला मिळतं. घटनास्थळी जमलेल्या प्रेक्षकांनी आपल्या मोबाईलमध्ये हा प्रकार रेकॉर्ड करण्यास सुरुवात केली. त्यामुळे तरुणी आणखीनच संतापली. तिने एका वाटसरुचा फोन हिसकावण्याचा प्रयत्न केला.

पाहा व्हिडीओ :

डिलिव्हरी बॉयची मध्यस्थी

हा प्रकार सुरु असतानाच एका फूड डिलिव्हरी एक्झिक्युटिव्हने हस्तक्षेप करुन भांडणाऱ्या जोडप्याला शांत करण्याचा प्रयत्न केला. तरुणीने वापरलेल्या अपशब्दांवर त्याने आक्षेप घेतला. त्यामुळे रागाच्या भरात तरुणीने डिलिव्हरी बॉयलाही शिवीगाळ करायला सुरुवात केली. इथे भावाचं टाळकं सटकलं. अखेर त्यानेही तरुणीला अपशब्द वापरण्यास सुरुवात केली. इतकंच नाही, तर तो तिलाही चोप द्यायला लागला.

तरुणाची सटकली

व्हिडिओमध्ये डिलिव्हरी बॉय तरुणीला धक्काबुक्की करताना आणि थप्पड मारताना दिसत आहे. चकित झालेल्या बघ्यांनी अखेरीस हस्तक्षेप करुन वाद शमवण्याचा प्रयत्न केला. तरुणी किंवा डिलिव्हरी एक्झिक्युटिव्ह या दोघांपैकी कोणीही अद्याप पोलिसात तक्रार दाखल केलेली नाही.

पाहा व्हिडीओ :

इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार भुवनेश्वरचे डीसीपी उमाशंकर दास म्हणाले, “दोन्ही बाजूंनी मारहाण केल्याने मी संबंधित पीएस अधिकाऱ्याला दोघांविरुद्ध गुन्हा नोंदवण्याचे निर्देश दिले आहेत.”

संबंधित बातम्या :

खिचडी खाल्ल्यावरुन वाद, बाप-लेकाची तरुणाला बेदम मारहाण, नांदेडमध्ये तरुणाचा मृत्यू

लहान मुलीचा विनयभंग, शिक्षकाला बाईने दप्तराने बडवलं, गावकऱ्यांनी तुडवलं

 Dombivli मध्ये ब्युटी पार्लरमध्ये घुसलेल्या दारुड्याला महिलेचा चोप

लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.
अजितदादा तिसऱ्या दिवशी विधिमंडळात प्रकटले? नॉटरिचेबल असण्याच कारण समोर
अजितदादा तिसऱ्या दिवशी विधिमंडळात प्रकटले? नॉटरिचेबल असण्याच कारण समोर.
'वन नेशन, वन इलेक्शन' रखडलं, सरकारच्या बाजूनं अन् विरोधात किती जण?
'वन नेशन, वन इलेक्शन' रखडलं, सरकारच्या बाजूनं अन् विरोधात किती जण?.
आधी अपहरण नंतर सरपंच संतोष देशमुखांची हत्या...मस्साजोगची A टू Z स्टोरी
आधी अपहरण नंतर सरपंच संतोष देशमुखांची हत्या...मस्साजोगची A टू Z स्टोरी.
मंत्रिमंडळ विस्तारात नाराजीरावांचा पूर, खातेवाटपाच्या वेळी काय होणार?
मंत्रिमंडळ विस्तारात नाराजीरावांचा पूर, खातेवाटपाच्या वेळी काय होणार?.
भुजबळांचं मंत्रिपद दादांनी मंत्रिपद नाकारलं? भुजबळ मोठा निर्णय घेणार?
भुजबळांचं मंत्रिपद दादांनी मंत्रिपद नाकारलं? भुजबळ मोठा निर्णय घेणार?.
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.