पती बाहेरुन आला अन् जेवायला बसला, मग जे समोर आलं ते पाहून सर्वांनाच धक्का बसला !

पती रात्री घरी आला असता त्याने जेवण मागितले. पत्नीने केवळ भाजी बनवली होती ती वाढली. पतीने भात बनवायला सांगितला. मात्र पत्नीने नकार दिला.

पती बाहेरुन आला अन् जेवायला बसला, मग जे समोर आलं ते पाहून सर्वांनाच धक्का बसला !
भात दिला नाही पतीने पत्नीला संपवलेImage Credit source: Google
Follow us
| Updated on: May 09, 2023 | 9:43 PM

संबलपूर : घरगुती हिंसाचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. ओडिशातील संबलपूर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पत्नीने भात बनवून दिला नाही म्हणून पतीने तिची हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. जामनकिरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नुआधी गावात रविवारी रात्री ही घटना घडली. सनातन धारुआ असे 40 वर्षीय आरोपीचे नाव असून, पुष्पा धारुआ असे 35 असे पीडितेचे नाव आहे. या जोडप्याला दोन मुले आहेत. पोलिसांनी सोमवारी आरोपी पतीला अटक केली आहे. पोलीस पुढील कारवाई करत आहेत.

पत्नीने भात बनवला नाही म्हणून पती संतापला

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सनातन रविवारी रात्री घरी आला आणि जेवायला बसला. जेवताना त्याने पाहिले तर पत्नीने भात केला नव्हता तर फक्त भाजी शिजवली होती. यानंतर पती-पत्नीमध्ये मोठा वाद झाला. वाद इतका वाढला की रागाच्या भरात सनातनने आपल्या पत्नीवर वार करून तिची हत्या केला. यावेळी त्यांची दोन्ही मुले घरी नव्हती. मुलगी घरकाम करते, तर मुलगा त्या रात्री मित्राच्या घरी झोपला होता.

मुलगा घरी आल्यानंतर घटना उघडकीस

मृत महिलेचा मुलगा घरी आल्यानंतर ही घटना उघडकीस आली. मुलगा घरी येताच त्याला आई मृतावस्थेत दिसली. त्याने तात्काळ पोलिसांना घटनेची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. यानंतर आरोपी पतीला अटक केली आहे. आईच्या हत्येमुळे दोन मुलांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.