बीडमध्ये जुन्या वादातून घर पेटवलं, वृद्ध दाम्पत्याचा संसार उघड्यावर, शहरात कायदा-सुव्यवस्थेचे तीनतेरा

शहरातून एक धक्कादायक घटना समोर आलीय. पेठबीडच्या बलभीम नगरमध्ये जुन्या वादातून एका माथेफिरुनं घर पेटवून दिल्याची घटना घडलीय. या आगीत संपूर्ण संसार जळून खाक झालाय. या घटनेवरुन कायदा आणि सुव्यवस्थेचे पुन्हा एकदा तीनतेरा वाजल्याचं बीड शहरातून समोर आलंय.

बीडमध्ये जुन्या वादातून घर पेटवलं, वृद्ध दाम्पत्याचा संसार उघड्यावर, शहरात कायदा-सुव्यवस्थेचे तीनतेरा
Image Credit source: TV9
Follow us
| Updated on: Mar 10, 2022 | 11:51 AM

बीड : शहरातून एक धक्कादायक घटना समोर आलीय. बीड (Beed) शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचे (law and order) तीनतेरा वाजल्याचा हा प्रकार आहे. पेठबीडच्या बलभीम नगरमध्ये जुन्या वादातून एका माथेफिरुनं घर पेटवून दिल्याची घटना घडलीय. या आगीत संपूर्ण संसार जळून खाक झालाय. या घटनेवरुन कायदा आणि सुव्यवस्थेचे पुन्हा एकदा तीनतेरा वाजल्याचं बीड शहरातून समोर आलंय. माथेफिरुन घर पेटवून दिल्यानं मोठं नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेमुळे पेठबीड परिसरात दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे. तर दुसरीकडे घर पेटवून देण्यासारखी घटना घडत असताना पोलिसांचं (Police) धाक राहिला नाही का, हाही प्रश्न सध्या चांगलाच चर्चेत आहे. बीड शहरातील ही धक्कादायक घटना समोर आल्यानं चांगलीच खळबळ उडाली आहे. दरम्यान, वृद्ध वामन कांबळे यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपीला जेरबंद केलं आहे.

वृद्ध दाम्पत्याचा संसार उघड्यावर

पेठबीडच्या बलभीम नगरमध्ये घर जाळण्याचा झालेला प्रकार गंभीर असून स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. घरात घुसून जुन्या वादातून कुरापती काढून एका माथेफिरूनं वृद्धाला घरात घुसून मारहाण केली. त्यानंतर घर पेटवून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. घरात लागलेल्या आगीत घरातील संसारोपयोगी सर्व साहित्य जळून खाक झालं आहे. या आगीत संपूर्ण संसार उद्धवस्त झाल्यानं वृद्ध दाम्पत्य उघड्यावर आलं आहे. दरम्यान, बीड शहरातील पेठबीडच्या घटनेमुळे पुन्हा एकदा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

कायदा-सुव्यवस्थेचे तीनतेरा

बीड शहरातील पेठबीडच्या बलभीम नगरमध्ये घडलेला प्रकार धक्कादायक असून याप्रकरणी कठोर कारवाईची मागणी होतेय आहे. आता यामध्ये वृद्ध दाम्पत्याचा संसार मात्र पूर्णपणे उद्धवस्त झालाय. पेठबीडमधील या प्रकारामुळे शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेचे तीनतेरा वाजल्याचं समोर आलं आहे. आता याप्रकरणी आणि असे प्रकार होऊ नये, यासाठी पोलीस काय प्रयत्न करतात, ते पाहणं महत्वाचं ठरेल.

इतर बातम्या

Goa Election Result 2022 | गोव्यात शिवसेना-राष्ट्रवादीचं काय झालं? भातखळकर म्हणतात, हाणलेली फिश करी राईस..

योगी बाबा 300 के पार, फिर से योगी सरकार, कार्यकर्त्यांची बॅनरबाजी

बाजारात चैतन्य परतले; मुंबई निर्देशांकांने घेतली 1552 अंकांची उसळी तर निफ्टीमध्ये 411 अंकांची तेजी

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.