मदर्स डेच्या दिवशी आईने दिला मुलाच्या पार्थिवाला खांदा, इंजिनीअरिंगच्या अभ्यासासाठी गेला होता कॅनडात

आयुष कॅनडात राहून शिकत होता. गेल्या सोमवारी आयुष टोरंटो येथे होता. तिथूनच तो बेपत्ता झाला.

मदर्स डेच्या दिवशी आईने दिला मुलाच्या पार्थिवाला खांदा, इंजिनीअरिंगच्या अभ्यासासाठी गेला होता कॅनडात
क्षुल्लक कारणातून तरुणाची हत्या
Follow us
| Updated on: May 14, 2023 | 7:41 PM

नवी दिल्ली : आज 14 मे. संपूर्ण जग मदर्स डे साजरा करत आहे. मदर्स डे हा आईप्रती प्रेम व्यक्त करण्याचा दिवस. पण, गुजरातमधील एका आईला तिच्या शेवटच्या श्वासापर्यंतचं दुःख झालं. कारण मुलाला प्रेमाने मोठं करणाऱ्या आईला मुलाच्या पार्थिवाला खांदा द्यावा लागला. गुजरातच्या भावनागर जिल्ह्यातील सिदसर गावात ही दुःखत घटना घडली.

टोरंटोवरून झाला बेपत्ता

सिदसर गावातील रहिवासी आणि पालनपूरचे डीएसपी रमेशभाई डाखर यांचा २३ वर्षीय मुलगा आयुषचा तीन दिवसांपूर्वी संदिग्ध अवस्थेत मृतदेह सापडला. आयुष कॅनडात राहून शिकत होता. गेल्या सोमवारी आयुष टोरंटो येथे होता. तिथूनच तो बेपत्ता झाला. मंगळवारी दुपारी त्याचा मृतदेह टोरंटोजवळ २० किमी अंतरावर एका पुलाच्या खाली सापडला. आयुषचं मेडिकल रिपोर्ट येणे अद्याप बाकी आहे. त्यानंतर त्याच्या संशयास्पद मृत्यूचं सत्य समोर येईल.

हे सुद्धा वाचा

चार गुजराती मित्रांसोबत राहायचा

कुटुंबीयांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आयुषने २०१९ रोजी कम्प्युटर इंजिनीअरिंगसाठी टोरंटो येथील यॉर्क युनिव्हर्सिटीत प्रवेश घेतला. आयुष टोरंटो येथे चार गुजराती मित्रांसोबत किरायाने एका अपार्टमेंटमध्ये राहत होता. आयुष पाच मे रोजी संध्याकाळी घरून निघाला होता. परंतु, अपार्टमेंटवर परतला नाही.

मित्रांनी आयुषच्या वडील रमेशभाई यांना फोन करून माहिती दिली. रमेशभाई यांच्या सांगण्यावरून मित्रांनी आयुष बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली. ८ मे रोजी आयुषचा मृतदेह सापडला. कुटुंबात आयुष व्यतिरिक्त त्यांचा लहान भाऊ आहे तो गांधीनगर येथे शिकतो.

अंत्ययात्रेत पूर्ण गावाचा सहभाग

काल उशिरा रात्री आयुषचा मृतदेह सिदसर गावात पोहचला. आज सकाळी आयुषच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अभागी आई-वडिलांनी त्याच्या पार्थिवाला खांदा दिला. आई-वडिलांना अश्रृ अनावर झाले होते. आयुषच्या अंत्यसंस्कारात पूर्ण गाव सहभागी झाला होता.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.