बार कोड स्कॅन करायला सांगत गंडा, दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या मुलीची 34 हजार रुपयांची फसवणूक
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची मुलगी हर्षिता केजरीवाल हिची एका वेबसाईटवर ऑनलाईन सोफा विक्री करताना फसवणूक झाली आहे.
नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची मुलगी हर्षिता केजरीवाल हिची एका वेबसाईटवर ऑनलाईन सोफा विक्री करताना फसवणूक झाली आहे. हर्षिता आपल्या घरातील एक सोफा ऑनलाईन पोर्टलवर विकत होती. यावेळी तिला पैसे पाठवण्याच्या नावाखील आरोपींनी 34 हजार रुपयांना गंडा घातला. हर्षिताने याबाबत पोलीस तक्रार करत गुन्हा नोंदवला आहे (Online fraud with Harshita Kejriwal daughter of Delhi CM Arvind Kejriwal).
फसवणूक नेमकी कशी झाली?
हर्षिताने एका वेबपोर्टलवर घरातील जुना सोफा विकण्यासाठी पोस्ट केली. यावर आरोपींनी हर्षिताकडे संबंधित सोफा विकत घेण्याची इच्छा व्यक्त केली. हर्षिता आणि त्यांच्या झालेल्या चर्चेनंतर तो सोफा विकत घेण्याचं त्यांनी निश्चित केलं. सोफ्याचे पैसे पाठवण्यासाठी त्यांनी आधी हर्षिताच्या बँक खात्यावर काही पैसे पाठवले. हर्षिताने ते पैसे मिळाल्याचं सांगितल्यानंतर त्यांनी तिला एक बार कोड स्कॅन करायला सांगितलं. हा बार कोड स्कॅन केल्यानंतर लगेचच हर्षिताच्या बँक खात्यावरुन 20 हजार रुपये कमी झाले.
फसवणूक झाल्याचं लक्षात येताच हर्षिताने संबंधितांना याबाबत जाब विचारला. मात्र, आरोपींनी चुकीने वेगळा बार कोड पाठवल्याची सारवासारव केली. तसेच नवा बार कोड स्कॅन करा हे पैसे परत येतील असंही सांगितलं. यावर विश्वास ठेऊन हर्षिताने पुन्हा एकदा नवा बार कोड स्कॅन केला. यावेळीही तिच्या बँक खात्यावरुन 14 हजार रुपये वजा झाले. त्यानंतर हर्षिताला आपण पूर्णपणे फसवलो गेल्याची जाणीव झाली. यानंतर तिने तात्काळ सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनमध्ये या फसवणुकीबाबत तक्रार दाखल केलीय.
पोलिसांनी या ऑनलाईन फसवणुकीचा तपास सुरु केला आहे. हर्षता केजरीवाल यांच्या तक्रारीवरुन आम्ही गुन्हा नोंदवला आहे. तसेच याची चौकशी सुरु केली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. तसेच आम्ही आरोपींना शोधत असल्याचंही पोलिसांनी नमूद केलं.
हेही वाचा :
ऑनलाईन शॉपिंग करताय, मग सावधान, मुंबई पोलिसांकडून फसवणूक करणाऱ्या वेबसाईट्सची यादी जाहीर
Job Fraud Gang | परदेशी नोकरीच्या आमिषाने 300 जणांची फसवणूक, मुंबईत 6 जणांच्या टोळीला अटक
P. N. Gadgil Jewellers | पुण्यात पु. ना. गाडगीळ ज्वेलर्सला 1 कोटी 60 लाखांचा गंडा, गुन्हा दाखल
व्हिडीओ पाहा :
Online fraud with Harshita Kejriwal daughter of Delhi CM Arvind Kejriwal