Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘मिथुन’ म्हणून ओळखला जाणारा रवींद्र ISI च्या हनीट्रॅपमध्ये कसा अडकला? कोणती कागदपत्रे आयएसआयला पाठवली?

Pakistan ISI Honey Trap: रवींद्र याने तपासात सांगितले की, जून 2024 मध्ये फेसबुकच्या माध्यमातून नेहा शर्मा या मुलीची ओळख झाली. ते फेसबुकनंतर मॅसेंजरवर बोलू लागले. त्यानंतर तिने त्याला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. व्हॉट्सअ‍ॅप नंबर दिला. मग व्हॉट्सअ‍ॅपवर त्यांचे बोलणे होऊ लागले.

'मिथुन' म्हणून ओळखला जाणारा रवींद्र ISI च्या हनीट्रॅपमध्ये कसा अडकला? कोणती कागदपत्रे आयएसआयला पाठवली?
pakistan isi honey trapImage Credit source: TV 9 Marathi
Follow us
| Updated on: Mar 15, 2025 | 3:45 PM

Pakistan ISI Honey Trap: पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआय एजंटला माहिती पुरवणारा फिरोजाबादमधील ऑर्डनन्स फॅक्टरीतील चार्जमन रवींद्र कुमार याला अटक झाली आहे. त्याच्या अटकेनंतर त्याच्या भागात राहणाऱ्या लोकांना धक्का बसला आहे. तो सोशल मीडियावर चित्रपटांची गाणी आणि व्हिडिओ शेअर करत होता. त्याला गल्लीतील लोक मिथुन म्हणत होते. फिरोजाबाद ऑर्डनन्स फॅक्टरीतील जंगलात त्याने अनेक व्हिडिओ बनवले होते. ते सोशल मीडियावर शेअरसुद्धा केले होते.

दीड वर्षांपासून संपर्क तोडले

रवींद्र कुमार याने गेल्या दीड वर्षांपासून सर्वांसोबत असलेले संपर्क तोडून टाकले. त्याची पत्नी आरती आणि मुलेसुद्धा कोणाशी संपर्क ठेवत नव्हते. त्याच्यासोबत त्याची पत्नी, दोन मुले आणि आई राहते. दहा वर्षांपूर्वी तो फिरोजाबादमधील ऑर्डनन्स फॅक्टरीत नोकरीस लागला. त्यापूर्वी त्याने अप्रेंटिस केली होती. त्याचे वडील आर्मीच्या वर्कशॉपमध्येच कामाला होते. नोव्हेंबर 2024 रोजी त्यांचा मृत्यू झाला.

असा आडकत गेला जाळ्यात

रवींद्र कुमार हा पाकिस्तानी महिलेच्या हनीट्रॅपमध्ये सापडल्याचे तपासातून समोर आले आहे. पाकिस्तानच्या आयएसआयच्या महिला एजंटने सोशल मीडियाच्या माध्यमातून रवींद्र कुमार याच्याशी मैत्री केली. त्यानंतर त्याच्याकडून माहिती घेवू लागली. हळहळू संवेदनशील माहिती ती जमा करु लागली. तिच्या जाळ्यात रवींद्रकुमार फसत गेला.

हे सुद्धा वाचा

काय काय मिळाले…

रवींद्र कुमार याला अटक केल्यानंतर त्याचा फोन जप्त करण्यात आला. त्यात अनेक गोपणीय कागदपत्रे मिळाली. त्यात फॅक्ट्रीचा उत्पादन रिपोर्ट, ड्रोन आणि अन्य संरक्षण उपकरणांची माहिती, भारतीय सैना आणि अधिकाऱ्यांची बैठकांची माहिती, फॅक्टरीतील स्टॉक लिस्ट, संवेदनशील कागदपत्रे मिळाली. ड्रोन आणि इतर संरक्षण सामग्रुची माहिती त्याच्याकडे होती.

नेहाने प्रेमाच्या जाळ्यात ओढले

रवींद्र याने तपासात सांगितले की, जून 2024 मध्ये फेसबुकच्या माध्यमातून नेहा शर्मा या मुलीची ओळख झाली. ते फेसबुकनंतर मॅसेंजरवर बोलू लागले. त्यानंतर तिने त्याला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. व्हॉट्सअ‍ॅप नंबर दिला. मग व्हॉट्सअ‍ॅपवर त्यांचे बोलणे होऊ लागले. नेहाने त्याला सोबत काम करत राहिल्यास तुला मालामाल करेल, असे सांगितले. त्यानंतर लालच देऊन ऑर्डनन्स फॅक्टरीची माहिती घेवू लागली. तिला माहिती पाठवल्यावर ती तो डिलीट करत होता.

बीडचा बिहार झालाय का? संतोष देशमुख हत्येची पुनरावृत्ती
बीडचा बिहार झालाय का? संतोष देशमुख हत्येची पुनरावृत्ती.
तुमच्या कारला फास्टटॅग आहे? असेल तर हा व्हिडीओ बघा, कारण 1 एप्रिलपासून
तुमच्या कारला फास्टटॅग आहे? असेल तर हा व्हिडीओ बघा, कारण 1 एप्रिलपासून.
'बीडमध्ये चाललंय काय? सरकार काय करतंय?' दमानियांच्या डोळ्यात अश्रू अन्
'बीडमध्ये चाललंय काय? सरकार काय करतंय?' दमानियांच्या डोळ्यात अश्रू अन्.
लोकलने आज प्रवास करताय? मध्य रेल्वेच्या मेनलाईनवर असा असणार मेगाब्लॉक
लोकलने आज प्रवास करताय? मध्य रेल्वेच्या मेनलाईनवर असा असणार मेगाब्लॉक.
देशात तणाव पसरवणंच त्यांच काम; संजय राऊतांचा हल्लाबोल
देशात तणाव पसरवणंच त्यांच काम; संजय राऊतांचा हल्लाबोल.
शिंदेंचे मंत्री जाहीरपणे म्हणाले, 'गुलाबराव पाटील गद्दार, पण जनतेनं..'
शिंदेंचे मंत्री जाहीरपणे म्हणाले, 'गुलाबराव पाटील गद्दार, पण जनतेनं..'.
खोक्याच्या कुटुंबाला मारहाण; 20 ते 25 जणांवर गुन्हा दाखल
खोक्याच्या कुटुंबाला मारहाण; 20 ते 25 जणांवर गुन्हा दाखल.
विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपचे उमेदवार ठरले, हे 3 उमेदवार जाहीर
विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपचे उमेदवार ठरले, हे 3 उमेदवार जाहीर.
औरंगजेबाची कबर उध्वस्त होणार! विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचा इशारा
औरंगजेबाची कबर उध्वस्त होणार! विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचा इशारा.
खोक्याचं घर जाळण्याची घाई का? धसांचा सवाल तर कराडचं जाळा, कोणाची मागणी
खोक्याचं घर जाळण्याची घाई का? धसांचा सवाल तर कराडचं जाळा, कोणाची मागणी.