शवविच्छेदन केलेल्या मृतांना सुद्धा त्याने सोडलं नाही, 101 जणांशी सेक्स करत व्हिडिओ बनवला आणि…

माणसं किती विकृत असू शकतात याचं उदाहरण देणारी एक घटना उघडकीस आली आहे. या माथेफिरुने जे केलं ते पाहून तुमच्याही तळपायाची आग मस्तका गेल्याशिवाय राहणार नाही.

शवविच्छेदन केलेल्या मृतांना सुद्धा त्याने सोडलं नाही, 101 जणांशी सेक्स करत व्हिडिओ बनवला आणि...
विकृताकडून शवागृहातील मृतदेहांवर बलात्कारImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Mar 20, 2023 | 2:59 PM

नवी दिल्ली : एखादी व्यक्ती विकृत असू शकते याचा प्रत्यय ब्रिटनमधील या घटनेवरुन येईल. या व्यक्तीचे सैतानी कृत्य उघड होताच सर्व हादरुन गेले. हा व्यक्ती रुग्णालयातील शवागृहात येणाऱ्या मृतदेहांवर बलात्कार करायचा. एवढ्यावरच तो थांबत नव्हता. मृतदेहाशी संबंध ठेवताना तो मृतदेहांचे फोटो आणि व्हिडिओ बनवत असे. हे सर्व फोटो आणि व्हिडिओ त्याने सेव्ह करुन ठेवले होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्याने 100 हून अधिक मृतदेहांवर बलात्कार केला. डेव्हिड फुलर असे या माथेफिरुचे नाव असून, तो ब्रिटनच्या एका रुग्णालयात इलेक्ट्रिशियन म्हणून काम करायचा.

दोन तरुणींची हत्या आणि लैंगिक अत्याचार प्रकरणी 68 वर्षीय डेव्हिड फुलर जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये त्याने आणखी 23 महिलांच्या मृतदेहांवर लैंगिक अत्याचार केल्याची कबुली दिली होती. 13 वर्षात त्याने हे गैरकृत्य केल्याचे त्याने कबूल केले. या प्रकरणात त्याला चार वर्षांची शिक्षा झाली आहे. यापूर्वी 78 मृतदेहांसोबत लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी त्याला 12 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

पोलिसांना सापडलेले फोटो आणि व्हिडिओ

एका 30 वर्षांहून अधिक काळ प्रलंबित हत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी 2020 मध्ये जेव्हा पोलीस त्याच्या खोलीत गेले, तेव्हा पोलिसांना तेथे जे आढळले ते पाहून त्यांना धक्काच बसला. येथे पोलिसांना डेविडच्या गुन्ह्यांचे पुरावे मिळाले. तो मुलींच्या मृतदेहांवर लैंगिक अत्याचार करायचा आणि त्याच्याकडे या जघन्य गुन्ह्याचे फोटो आणि व्हिडीओही असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्याने अनेक पीडितांच्या नावे फोल्डर बनवले होते.

हे सुद्धा वाचा

खरं तर, 2020 मध्ये, ब्रिटनमध्ये दोन ठिकाणी दोन तरुणींच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी फुलरला अटक केली होती. याशिवाय त्याच्याकडे ‘बेस्ट एव्हर’ नावाचे आणखी एक फोल्डर होते.

101 मृतदेहांसोबत लैंगिक अत्याचार

2007 ते 2020 या कालावधीत डेव्हिडने 101 महिलांच्या मृतदेहांचे लैंगिक शोषण केल्याचा खुलासा तपास पथकासमोर केला होता. डेव्हिड 1989 पासून हॉस्पिटलमध्ये इलेक्ट्रिशियन म्हणून काम करत होता. त्याने प्रथम केंट आणि ससेक्स रुग्णालयात काम केले. 2011 मध्ये हे रुग्णालय बंद झाले, तोपर्यंत तो तेथे काम होता. यानंतर तो ट्युनब्रिज वेल्स हॉस्पिटलमध्ये काम करू लागला.

कर्मचाऱ्यांच्या अनुपस्थितीत शवागृहात जायचा

डेव्हिड फुलर कर्मचार्‍यांच्या अनुपस्थितीत हॉस्पिटलच्या शवागृहात जायचा आणि नंतर मृतदेहांसोबत हे घाणेरडे कृत्य करायचा. त्याने मुली आणि महिलांच्या मृतदेहांवर अनेक वेळा हे कृत्य केले. शवागृहात सीसीटीव्ही नसल्यामुळे त्याला हे घृणास्पद कृत्य करण्यात मदत झाली. 101 मृतदेहांपैकी 10 मृतदेहांची ओळख पटवण्यात पोलिसांना अद्याप यश आलेले नाही.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.