नवविवाहिता म्हणून सासरी पाऊल ठेवताच सरकली पायाखालची जमीन, सत्य समजलं, ते खूपच भयानक
सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. इतकच नाही, त्याने पत्नीच्या जवळच्या नातेवाईकांच्या मोबाइलवर तो अश्लील व्हिडिओ पाठवला.
पाकुड : निकाह करुन तिने घरी पाऊल ठेवलं. तिच्या डोळ्यात सुंदर संसाराची स्वप्न होती. पण वास्तव तिच्या कल्पनेपेक्षाही भयानक होतं. स्वप्नातही विचार केला नसेल, इतकी मोठी तिची फसवणूक झाली. इंजिनिअर असल्याच भासवून एका व्यक्तीने तिच्यासोबत निकाह केला. हा त्याचा तिसरा निकाह होता. म्हणजे त्याची दोन लग्न झालेली होती. हुंड्यासाठी म्हणून त्याने हा निकाह केला होता.
आरोपीला, जेव्हा त्याच्या इराद्यांमध्ये यश मिळालं नाही, तेव्हा त्याने मानवतेला लाजवणारी कृती केली. त्याने आपल्याच नवविवाहित बायकोचा अश्लील व्हिडिओ बनवला व तिच्याकडे 5 लाख रुपये हुंड्याची मागणी केली.
3 महिन्यात पितळ उघडं पडलं
पत्नीने इतके पैसे देण्यास नकार दिला, तेव्हा आरोपी जावेद शेखने कुटुंबियांसह मिळून नवविवाहित पत्नीला मारहाण सुरु केली. झारखंडच्या पाकुड जिल्ह्यात ही धक्कादायक घटना घडली. लग्नानंतर अवघ्या 3 महिन्यात स्वत:ला इंजिनियर म्हणणाऱ्या जावेद शेखच पितळ उघडं पडलं.
स्वत: इंजनियिर आणि अविवाहित असल्याच भासवून जावेद शेखने युवतीबरोबर निकाह केला होता. युवती पाकुड जिल्ह्यातील नगर ठाणा क्षेत्रात रहाणारी आहे. 3 महिन्यापूर्वी 12 फेब्रुवारीला हे लग्न झालं होतं.
शेजाऱ्यांकडून समजल वास्तव
नवविवाहिता लग्नानंतर सासरी रांची येथे पोहोचली, तेव्हा तिला शेजाऱ्यांकडून जावेद शेखची ती तिसरी पत्नी असल्याच समजलं. त्याची याआधी दोन लग्न झाली होती. हुंड्याचे पैसे दिले नाही, म्हणून त्याने आपल्या दोन्ही पत्नीना मारहाण केली. त्यामुळे त्या घरसोडून निघून गेल्या होत्या. त्यानंतर त्याने पुन्हा तिसरं लग्न केलं.
अश्लील व्हिडिओ बनवला
शेजाऱ्यांकडून सत्य समजल्यानंतर महिलेने जावेद शेखकडे या बद्दल विचारणा केली. पत्नीने जाब विचारताच जावेद शेख खवळला. त्याने आपल्या बायकोचाच अश्लील व्हिडिओ बनवला व हुंड्यापोटी 5 लाख रुपये मागितले. पैसे देणार नाही असं तिने सांगितल्यानंतर त्याने तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. इतकच नाही, त्याने पत्नीच्या जवळच्या नातेवाईकांच्या मोबाइलवर तो अश्लील व्हिडिओ पाठवला. हुंड्याचे पैसे मिळत नाहीत, म्हणून त्याने नवविवाहित पत्नीला निदर्यतेने मारहाण सुरु केली. तिला घरातून हाकलून दिलं. त्यानंतर मुलीच्या कुटुंबियांनी जावेद शेख आणि त्याच्या कुटुंबियांविरोधात पोलिसात तक्रार नोंदवली.