Palghar Crime : जुना वाद उफाळून आला, महिलेवर जीवघेणा हल्ला, कुठे घडली घटना?

महिलांवरील अत्याचाराच्या घटना थांबण्याचे नावच घेताना दिसत नाहीत. विरारमधील महिलेवर हल्ल्याची घटना घडल्याचे उघडकीस आले आहे.

Palghar Crime : जुना वाद उफाळून आला, महिलेवर जीवघेणा हल्ला, कुठे घडली घटना?
विरारमध्ये महिलेवर जीवघेणा हल्लाImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jul 16, 2023 | 8:06 AM

विरार : जुन्या वादातून महिलेवर दुकनात घुसून कोयत्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना विरारमध्ये घडली आहे. या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली आहे. जखमी महिलेवर विरारच्या संजीवनी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. प्रचिती पाटील असे हल्ला झालेल्या महिलेचे नाव आहे. हल्ल्याची संपूर्ण घटना दुकानातील सीसीटीव्हीत कैद झाली आहे. घटनेची माहिती मिळताच विरार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. यानंतर रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. हा हल्ला नेमका कुणी आणि कोणत्या वादातून केला हे अद्याप कळू शकले नाही. पोलीस सखोल तपास करत आहेत.

काय घडलं नेमकं?

विरार पश्चिमेला प्लॅटफॉर्म क्र एकच्या बाजूला भास्कर कॉम्प्लेक्समध्ये झेरॉक्स आणि जनरल स्टोअरचे दुकान आहे. याच दुकानात पीडित महिला काम करते. काल रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास एक आरोपी दुकनात घुसला. त्याने महिलेवर कोयत्याने वार करण्यास सुरवात केली. महिलेवर हल्ला करुन तिला जखमी करत आरोपी फरार झाला.

विरार पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत महिलेला रुग्णालयात दाखल केले. घटनास्थळाचा पंचनामा करत गुन्हा नोंदवण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरु होते. सहा महिन्यांपूर्वी झालेल्या जुन्या वादातून हा हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती मिळते. तपासाअंती सर्व प्रकरण उघडकीस येईल.

हे सुद्धा वाचा

'विरोधीपक्षनेता बनवता येत नाही, त्यांनी CM पदावर बोलू नये'- उदय सामंत
'विरोधीपक्षनेता बनवता येत नाही, त्यांनी CM पदावर बोलू नये'- उदय सामंत.
नागराज मंजुळे अडचणीत, न्यायालयानं बजावलं समन्स, प्रकरण नेमकं काय?
नागराज मंजुळे अडचणीत, न्यायालयानं बजावलं समन्स, प्रकरण नेमकं काय?.
बॅलेट पेपरवर निवडणुका नाहीच, कोर्टाचा थेट नकार, 'ती' याचिका फेटाळली
बॅलेट पेपरवर निवडणुका नाहीच, कोर्टाचा थेट नकार, 'ती' याचिका फेटाळली.
'ठाकरेंची अवस्था शोलेतील असरानी सारखी...',भाजपच्या बड्या नेत्याची टीका
'ठाकरेंची अवस्था शोलेतील असरानी सारखी...',भाजपच्या बड्या नेत्याची टीका.
'शरद पवार नावाचा अध्याय राजकारणातून संपला', भाजप नेत्याचा निशाणा
'शरद पवार नावाचा अध्याय राजकारणातून संपला', भाजप नेत्याचा निशाणा.
शरद पवार गटाच्या बैठकीत विधानसभेच्या निकालावर नाराजी, EVM विरोधात रोष
शरद पवार गटाच्या बैठकीत विधानसभेच्या निकालावर नाराजी, EVM विरोधात रोष.
'मुख्यमंत्रिपदासाठी कोणाचं नाव...', संजय शिरसाटांची मोठी प्रतिक्रिया
'मुख्यमंत्रिपदासाठी कोणाचं नाव...', संजय शिरसाटांची मोठी प्रतिक्रिया.
नवा CM कोण? उत्सुकता शिगेला, 'रामगिरी'वर पुन्हा शिंदेंच्या नावाची पाटी
नवा CM कोण? उत्सुकता शिगेला, 'रामगिरी'वर पुन्हा शिंदेंच्या नावाची पाटी.
शिंदेंची नाराजी दूर व्हावी म्हणून भाजपची खेळी, आठवलेंचं वक्तव्य अन्...
शिंदेंची नाराजी दूर व्हावी म्हणून भाजपची खेळी, आठवलेंचं वक्तव्य अन्....
नव्या सरकारचा शपथविधी कधी? नवा CM कोण? भाजपचा बडा नेता म्हणाला...
नव्या सरकारचा शपथविधी कधी? नवा CM कोण? भाजपचा बडा नेता म्हणाला....