Palghar : चेटकीण ठरवत महिलेची अवहेलना! पालघरच्या हळदी समारंभातील संतापजनक प्रकार, गुन्हा दाखल

Palghar News : वाडा तालुक्यातील बिरशेती या गावातील ही घटना आहे.

Palghar : चेटकीण ठरवत महिलेची अवहेलना! पालघरच्या हळदी समारंभातील संतापजनक प्रकार, गुन्हा दाखल
धक्कादायक प्रकारImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Jun 12, 2022 | 12:37 PM

पालघर : अंधश्रद्ध, अनिष्ट रुढी, अघोरी प्रथा याच्या जोखडातून बाहेर पडण्याचं आवाहन सातत्यानं केलं जातं. पण अनेकदा अघोरी आणि संतापजनक प्रकार उघडकीस येत असल्यानं चिंता व्यक्त केली जाते. आता पालघर जिल्ह्यातून (Palghar News) एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. पालमध्ये एका महिलेला चेटकीण ठरवत तिची अवहेलना करण्यात आली. यानंतर तिच्यापासून सावध राहा असा इशाराही लोकांना देण्यात आला. ही महिला भुताटकी (Black magic) करते, असा आरोप भर कार्यक्रमात करण्यात आला. या महिलेची मान पकडून तिच्चयावर भंडारा उधळत नारळही फोडण्यात आला होता. या संपूर्ण घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त केला जातोय. याप्रकरणी आता पोलीस ठाण्यात (Palghar crime news) तक्रारही दाखल करण्यात आलीय. हळदीच्या कार्यक्रमात विधी करत असलेल्या भगत तरुणांच्या अंगावत वारा आल्याचं सांगत या महिलेसोबत अपमानास्पद कृत्य करण्यात आलाय.

नेमका कुठे घडला प्रकार?

पालघर मधील वाडा येथे एक हळदी समारंभ सुरु होता. या हळदी समारंभात एका आदिवासी महिलेला चेटकीण ठरवत तिची भर समारंभात लोकांसमोर अवहेलना करण्यात आली. हा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर एकच संताप व्यक्त केला जातोय.

वाडा तालुक्यातील बिरशेती या गावातील ही घटना आहे. याच गावातील एका हळदी समारंभात पारंपारिक पद्धतीने कुलदैवतांची पूजा अर्थात देवादेवी सुरू होती. मात्र अचानक भगत असलेल्या दोन तरुणांच्या अंगात वारा आल्याच सांगत त्यांनी या महिलेला मंडपाच्या मध्यभागी उभ करत तिच्यावर भंडारा उधळला . तसंच ही महिला भुताटकी करत असून तिच्या पासून सावध रहा असही लग्नसमारंभातील उपस्थितांना आवाहन केलं.

हे सुद्धा वाचा

गुन्हा दाखल

या आदिवासी महिलेच्या मानेला पकडून तिच्यावर भंडारा उधळत नारळ फोडण्यात आला. या सगळ्या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जातोय. या घटनेनंतर पीडित महिलेने वाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिलीयय. आरोपींविरोधात अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा, महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा तसेच जादूटोणा प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.