Palghar: प्रेयसी ‘गंडवत’ असल्यामुळे लहान मुलाचे अपहरण, कुटुंबियांना फुटला घाम, पण…

लग्नास चालढकल करणाऱ्या प्रेयसीच्या मोठ्या बहिणीच्या मुलाचे अपहरण, प्रकरण उजेडात येताचं पोलिस सुध्दा...

Palghar: प्रेयसी 'गंडवत' असल्यामुळे लहान मुलाचे अपहरण, कुटुंबियांना फुटला घाम, पण...
शाळा भरण्यापूर्वी अपहरण Image Credit source: twitter
Follow us
| Updated on: Jan 10, 2023 | 8:08 AM

पालघर : प्रेयसी वारंवार गंडवत असल्यामुळे संपालेल्या प्रियकराने (boyfriend) प्रेयसीच्या लहान मुलाचे अपहरण केले. त्यानंतर रोक रक्कम आणि प्रेयसीच्या बहिणीला प्रेयसीला घरी पाठवण्याची मागणी केली. संबंधित कुटुंबाने पोलिसांना संपर्क साधला. त्यानंतर पोलिसांनी (POLICE) अवघ्या तासाभरात मुलाची सुटका केली आणि आरोपीला ताब्यात घेतले असल्याची घटना पालघरमध्ये (PALGHAR) घडली. कालपासून पालघरमध्ये हा चर्चेचा विषय ठरला आहे.

4 वर्षांपासून त्याचे प्रेम संबंध

विशेष म्हणजे अपहरणकर्ता हा आरोपी युट्युबर आणि आदिवासी सिंगर असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. राजेश धोदडे असे आरोपीचे नाव असून फिर्यादी महिलेच्या बहिणी सोबत गेल्या 4 वर्षांपासून त्याचे प्रेम संबंध होते. परंतु चार वर्षापासून संबंध असून ही लग्नास चालढकल करत असल्याने प्रेयसीला प्रियकराशी संबंध न ठेवण्यास प्रेयसीची बहीण कारणीभूत ठरत असल्याची माहिती आरोपीने पोलिसांना सांगितली आहे.

हे सुद्धा वाचा

शाळा भरण्यापूर्वी अपहरण

संतापलेल्या प्रियकराने राग मनात धरत प्रेयसीच्या मोठ्या बहिणीच्या 8 वर्षीय मुलांचेच सोमवारी शाळा भरण्यापूर्वी अपहरण केल्याचा प्रकार उजेडात आले. तलासरी पोलीसांनी सदर घटनेची माहिती मिळताच तातडीने दोन टीम तयार करत संशयित आरोपीचे फोन लोकेशन्स व संबंधित माहितीच्या आधारे तपास करत आरोपीस चारोटी येथून अटक केली.

आरोपीच्या माहितीवरून अपहरण झालेल्या मुलाला केंद्र शासित प्रदेश सेलवास खानवेल येथून यशस्वीरित्या ताब्यात घेत सुटका करून आईच्या स्वाधीन केले. याबाबत तलासरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.