Pandharpur Murder : गळा दाबून खून, मृतदेह नदीत फेकला! प्रेमप्रकरणातून 25 वर्षीय लखनची हत्या, पंढरपूर जवळील वाखरी हादरलं

Wakhari Murder News : या खून प्रकरणी अवघ्या सहा तासात पंढरपूर ग्रामीण पोलिसांनी संशयित आरोपींच्या मुसक्या आवळल्या. याप्रकरणी युवराज सातपुते व तुषार मेटकरी (रा. दाळे गल्ली, पंढरपूर) या दोन संशयित आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

Pandharpur Murder : गळा दाबून खून, मृतदेह नदीत फेकला! प्रेमप्रकरणातून 25 वर्षीय लखनची हत्या, पंढरपूर जवळील वाखरी हादरलं
पंढरपुरात खळबळ...Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Aug 24, 2022 | 7:44 AM

पंढरपूर : प्रेमप्रकरणातून (Love Affaire) झालेल्या हत्याकांडाने पंढरपूरजवळील (Wakhari, Pandharpur) वाखरी हादरुन गेलंय. एका तरुणाची गळा दाबून हत्या करण्यात आली. त्यानंतर मृत तरुणाचा देह (Pandharpur Murder News) विहिरीमध्ये फेकून देण्यात आला होता. कमरेला चक्क दगड बांधलेल्या अवस्थेत या तरुणाचा मृतदेह आढळून आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मृतदेह ताब्यात घेतला. त्यानंतर पुढील तपास करण्यात सुरुवात केली. सुरुवातीच्या अवघ्या सहा तासांच्या आतच पोलिसांनी या हत्याकांड प्रकरणी दोघा जणांना अटक केली असून त्यांची आता कसून चौकशी केली जातेय. संपूर्ण वाखरीमध्ये या घटनेनं खळबळ उडाली असून हे हत्याकांड प्रेमप्रकरणातून झाल्याचं सांगितलं जातंय. स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनी या तरुणाच्या हत्येबाबात धक्कादायक खुलासे केले आहेत. पोलीस निरीक्षक धनंजय दाधव यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे.

काय म्हणाले पोलीस?

प्रेम प्रकरणातून एका तरुणा गळा दाबून खून करुन मृतदेह विहीरीत टाकून दिल्याची घटना उघडकीस आली. पंढरपूर जवळच्या वाखरी गावात हे हत्याकांड घडलं. या खून प्रकरणी अवघ्या सहा तासात पंढरपूर ग्रामीण पोलिसांनी संशयित आरोपींच्या मुसक्या आवळल्या. याप्रकरणी युवराज सातपुते व तुषार मेटकरी (रा. दाळे गल्ली, पंढरपूर) या दोन संशयित आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. आता त्यांची कसून चौकशी सुरु असल्याची माहिती पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी दिली आहे.

विचित्र अवस्थेत आढळला मृतदेह

वाखरी येथील हॉटेल व्यावसायिक असलेल्या लखन सुनिल गांडुळे (वय 25 ) या तरुणाचा सोमवारी वाखरी येथील याकूब शेख यांच्या शेतातील विहीरीत मृतदेह आढळून आला. खळबळजनक बाब म्हणजे विहिरीतील पाण्यात कमरेला दगड बांधलेल्या अवस्थेत लखनचा मृतदेह आढळून आला होता. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली.

हे सुद्धा वाचा

पंढरपूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक धनंजय जाधव व गुन्हे प्रकटीकरण पथकाने योग्य दिशेने तपास करुन अवघ्या सहा तासात संशयित आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.दोन्ही संशयित आरोपींना आज येथील न्यायालयात हजर केले असता 28 ऑगस्ट पर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे. प्रेमप्रकरणातून लखन गांडुळे यांचा खून केल्याचे संशयित आरोपींनी तपासा दरम्यान कबुली दिल्याची माहिती पोलिस निरीक्षक धनंजय जाधव यांनी दिली आहे. सध्या याप्रकरणी पुढील तपास सुरु आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.