परमबीर सिंहांनी ईडीला दिलेल्या जबाबात सनसनाटी खुलासे! अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये परब आणि देशमुखांचा हात?

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता बळावत चालली आहे. कारण मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी ईडीला दिलेल्या जबाबात अनेक सनसनाटी खुलासे केले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी मला सचिन वाझेला पुन्हा सेवेत घेण्याच्या सूचना केल्याचा दावा परमबीर सिंह यांनी ईडीकडे केलाय.

परमबीर सिंहांनी ईडीला दिलेल्या जबाबात सनसनाटी खुलासे! अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये परब आणि देशमुखांचा हात?
परमबीर सिंह, अनिल देशमुख, उद्धव ठाकरे
Follow us
| Updated on: Feb 02, 2022 | 5:57 PM

कृष्णा सोनारवाडकर, मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता बळावत चालली आहे. कारण मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Parambir Singh) यांनी ईडीला दिलेल्या जबाबात अनेक सनसनाटी खुलासे केले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray), माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी मला सचिन वाझेला पुन्हा सेवेत घेण्याच्या सूचना केल्याचा दावा परमबीर सिंह यांनी ईडीकडे केलाय. त्याचबरोबर सचिन वाझेला सेनेत घेतल्यानंतर गुन्हे शाखेत महत्वाच्या पदावर नियुक्ती द्या असंही आपल्याला सांगण्यात आलं होतं, असं परमबीर सिंह यांनी ईडीला दिलेल्या जबाबात म्हटलंय.

अनिल देशमुखांनी वाझेकडे 2 कोटी मागितले?

परमबीर सिंह ईडीला दिलेल्या जबाबात म्हणाले की, सीआययुमध्ये नियुक्ती दिल्यानंतर काही महत्वाच्या केसेस सचिन वाझेला सोपवण्यात आल्या. त्या केसेस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अनिल देशमुख यांनी दिलेल्या सूचनेनुसार वाझेला देण्यात आल्या. टीआरपी घोटाळ्यातील अर्णब गोस्वामी यांचं प्रकरणही याचवेळी वाझेला सोपवण्यात आलं होतं, असंही सिंह यांनी म्हटलंय. त्याचबरोबर सचिन वाझे अनिल देशमुख यांना नियमित रिपोर्ट द्यायचा, त्यांना ब्रिफ करायचा. वाझेनं मला सांगितलं होतं की पुन्हा पोलीस दलात येण्यासाठी त्याच्याकडून अनिल देशमुख यांनी दोन कोटी मागितले होते, असा धक्कादायक खुलासाही परमबीर सिंह यांनी ईडीकडे केलाय.

पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबत धक्कादायक गौप्यस्फोट

इतकंच नाही तर, मला वारंवार सह्याद्री गेस्ट हाऊसला बोलावलं जायचं. तिथे अनिल देशमुख आणि अनिल परब यांच्याकडून पोलिसांच्या बदल्यांसंदर्भात यादी मला दाखवली जायची. मुंबईतल्या बदल्यांमध्ये अनिल परब आणि अनिल देशमुख यांचा हस्तक्षेप होता. मी जुलै 2020 मध्ये मुंबईतील डीसीपींच्या बदल्यांची ऑर्डर काढली होती. ती मला सीताराम कुंटे यांनी मागे घ्यायला लावली. त्यावेळी मला व्हॉट्सअप मेसेज सीताराम कुंटे यांनी केला आणि उद्धव ठाकरे यांनी तो आदेश मागे घ्यायला लावला होता, असा दावाही परमबीर सिंह यांनी केलाय. त्यानंतर सीताराम कुंटे यांनी सूचना दिल्याप्रमाणे मी डीसीपींच्या बदल्यांचा आदेश मागे घेतला. कुंटे यांनी केलेला व्हॉट्सअप मेसेज आजही आपल्याकडे आहे. अनिल देशमुख यांचं हस्ताक्षर असलेल्या काही याद्या आजही माझ्याकडे आहेत, असा गौप्यस्फोटही सिंह यांनी ईडीला दिलेल्या जबाबात केलाय.

देशमुखांकडून अनेकदा नियमांचं उल्लंघन – सिंह

डीसीपी झोन 7 यांची नियुक्ती ही अनिल देशमुख यांच्या सूचनेनुसार करण्यात आली. अनिल देशमुख यांच्यामुळे अनेकदा पोलीस इस्टॅब्लिशमेंट बोर्डच्या नियमांचं उल्लंघन झालं. देशमुख कधी स्वत: तर कधी सीताराम कुंटे यांच्या माध्यमातून नियमांची पायमल्ली करुन सूचना द्यायचे. प्रशांत कदम यांची नियुक्तीही झोन 7 ला अशीच करण्यात आल्याचा खुलासाही परमबीर सिंह यांनी आपल्या जबाबात केलाय.

इतर बातम्या :

परमबीर सिंहांनी ईडीला दिलेल्या जबाबात सणसणाटी खुलासे! अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये परब आणि देशमुखांचा हात?

Goa Assembly Election 2022 : गोव्यासाठी राष्ट्रवादीकडून 24 स्टार प्रचारकांची यादी, शरद पवारांसह कोणते नेते प्रचारासाठी रिंगणात उतरणार?

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.