परमबीर सिंहांना अटकेपासून संरक्षण देण्यास राज्य सरकारचा नकार, ठाणे प्रकरणी नेमकं काय होणार?

परमबीर सिंह कुठे आहेत हे माहिती नसल्याचं राज्य सरकारनं म्हटलंय. परमबीर सिंह यांना अटक करणार नाही, याबाबत शाश्वती देण्यास राज्य सरकारनं नकार दिलाय. परमबीर सिंह कुठे आहेत माहिती नाही. ते समन्सना उत्तर देत नाहीत, असंही सरकारनं म्हटलं आहे.

परमबीर सिंहांना अटकेपासून संरक्षण देण्यास राज्य सरकारचा नकार, ठाणे प्रकरणी नेमकं काय होणार?
परमबीर सिंग
Follow us
| Updated on: Oct 20, 2021 | 4:02 PM

मुंबई : परमबीर सिंह यांच्या अटकेच्या शक्यतेवरुन अस्पष्टता दिसत आहे. सिंह यांच्या अटकेवरुन शाश्वती देण्यास राज्य सरकारनं नकार दिला आहे. परमबीर सिंह कुठे आहेत हे माहिती नसल्याचं राज्य सरकारनं म्हटलंय. परमबीर सिंह यांना अटक करणार नाही, याबाबत शाश्वती देण्यास राज्य सरकारनं नकार दिलाय. परमबीर सिंह कुठे आहेत माहिती नाही. ते समन्सना उत्तर देत नाहीत, असंही सरकारनं म्हटलं आहे. (State government has refused to protect Parambir Singh from arrest in the High Court)

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावर अॅट्ऱॉसिटी आणि खंडणीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणात तपासादरम्यान त्यांना वारंवार समन्स बजावूनही ते कुठे आहेत? याचा पत्ता राज्य सरकारला लागू शकलेला नाही. त्यामुळे आता परमबीर सिंह यांच्यावर आम्ही कठोर कारवाई करणार नाही असा शब्द आम्ही देणार नाही, असं राज्य सरकारनं हायकोर्टात म्हटलंय. अॅट्रॉसिटी प्रकरणात दोन वेळा समन्स बजावण्यात आलं होतं त्याला सिंह यांनी उत्तर दिलं होतं, अशी माहिती सिंह यांचे वकील महेश जेठमलानी यांनी कोर्टात दिली आहे. मात्र, यापूर्वी परमवीर सिंह यांच्यावर कठोर कारवाई किंवा त्यांना अटक करणार नाही असं राज्य सराकरनं कोर्टात म्हटलं होतं. पण आजच्या सुनावणीवेळी हा शब्द आम्ही पुढे नेऊ शकणार नाही, कारण ते कुठे आहेत याचा पत्ता आम्हाला लागलेला नाही. ते कुठल्याही समन्सला उत्तर देत नाहीत, असं राज्य सरकारनं म्हटलंय.

नेमकं प्रकरण काय?

खोट्या एफआयआरच्या माध्यमातून माझी प्रचंड छळवणूक केली असा आरोप करत पोलिस अधिकाऱ्यानेच अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत एफआयआर दाखल केली आहे. या प्रकरणात सिंह यांना अटकेसारख्या कठोर कारवाईपासून असलेला दिलासा 21 ऑक्टोबरपर्यंत कायम ठेवण्यात आला होता.

‘परमबीर सिंह हे ठाण्याते पोलिस आयुक्त असताना कल्याण-डोंबिवली महापालिकेतील बिल्डरांच्या एका भ्रष्टाचार प्रकरणातील अनेक आरोपींची नावे वगळण्याच्या त्यांच्या दबावाला मी बळी पडलो नाही. म्हणून माझ्याच विरोधात अनेक खोटे एफआयआर दाखल करायला लावून त्यांनी माझी प्रचंड छळवणूक केली. शिवाय अंतिमत: न्यायालयाच्या निकालाने माझी निर्दोष मुक्तता झालेल्या एका प्रकरणात मला नाहक 14 महिने तुरुंगवास भोगावा लागला’ असा आरोप करत पोलिस निरीक्षक भीमराज घाडगे यांनी सिंह यांच्या विरोधात एफआयआर दाखल केला आहे.

परमबीर सिंहांच्या नावे सिन्नरमध्ये अफाट ‘माया’

परमबीर सिंह यांच्या नावे सिन्नरमध्ये अफाट ‘माया’ असून, त्यांनी ही मालमत्ता संजय पुनमियाच्या नावे खरेदी केल्याचे समोर येत आहे. विशेष म्हणजे याप्रकरणी संजय पुनुमियाविरोधात अग्रवाल नावाच्या व्यक्तीने सिन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. नाशिक जिल्हा ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी या साऱ्या प्रकरणाची चौकशी सुरू केली असून, मुंबई पोलिसांची कस्टडी संपताच पुनुमियाला ताब्यात घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

संजय पुनमिया सध्या एका खंडणी प्रकरणात मुंबई पोलिसांच्या अटकेत आहे. तो मुंबईचे वादग्रस्त ठरलेले माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचा निकटवर्तीय म्हणून ओळखला जातो. पुनमिया ठाणे जिल्ह्यातला रहिवासी आहे. त्याने सिन्नर तालुक्यात अनेक मालमत्तांची खरेदी केली असून, त्यात धारणगाव, मिरगाव, पाथरे येथे कोट्यवधींची जमीन खरेदी केल्याचे वृत्त दैनिक लोकमतने 11 ऑक्टोबरच्या अंकात प्रसिद्ध केले होते. ही जमीन पुनमियाने आपला मुलगा सनीच्या नावावरही खरेदी केली. त्यासाठी शेतकरी असल्याचे बनावट पुरावे जोडले. हे सारे सिन्नरच्या दुय्यम निबंध कार्यालयात बिनाबोभाट पार पडले. याचे कारण म्हणजे पुनमियाच्या डोक्यावर असलेला परमबीर सिंहाचा वरदहस्त असल्याची चर्चा सुरू आहे.

इतर बातम्या :

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवारांमध्ये खलबतं, केंद्रीय तपास यंत्रणांविरोधात व्यूहरचना?

Aryan Khan Drugs Case | शाहरुखला पुन्हा झटका, ड्रग्ज प्रकरणात आर्यन खानचा जामीन फेटाळला

State government has refused to protect Parambir Singh from arrest in the High Court

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.